![]()
बँकींग क्षेत्रातली एक महत्त्वाची बातमी. HDFC लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून विभा पाडळकर यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या संचालक मंडळाने 21 एप्
.
विभा पाडळकर यांची ही पुनर्नियुक्ती 12 सप्टेंबर 2026 पासून लागू होणार असून पुढील पाच वर्षांसाठी असेल. मात्र, या निर्णयासाठी भागधारकांची मान्यता आणि भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (IRDAI) यांची मंजुरी आवश्यक राहणार आहे.
विभा पाडळकर या 2008 पासून HDFC लाइफशी जोडल्या असून त्यांनी विविध नेतृत्व पदांवर काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने सातत्यपूर्ण कामगिरी केली असून धोरणात्मक नियोजन, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि शाश्वत वाढ यावर विशेष भर देण्यात आला आहे. 2017 मध्ये HDFC लाइफच्या यशस्वी शेअर बाजारातील नोंदणीमध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. तसेच भारतीय जीवन विमा क्षेत्रातील पहिल्या विलीनीकरण व अधिग्रहण प्रक्रियेत त्यांनी कंपनीचे नेतृत्व केले होते.
पाडळकर या उद्योगातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय असून त्यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवले आहेत. त्यामध्ये ‘बिझनेसवुमन ऑफ द इयर’सह विविध प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे. दरम्यान, कंपनीने स्पष्ट केले आहे की, विभा पाडळकर यांच्यावर कोणत्याही नियामक संस्थेकडून संचालक पद भूषवण्यास कोणतीही बंदी नाही.