Headlines

Vijay Wadettiwar Slams Maharashtra Govt Over Manoj Jarange Agitation


“मनोज जरांगे यांना राज्य सरकार नक्की का घाबरत आहे? ते उपोषणाला बसले की सरकारचे मंत्री त्यांच्यापुढे पायघड्या घालतात, त्यामुळेच त्यांची हिंमत वाढली आहे, असे म्हणत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील आ

.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना किंवा इतर कोणत्याही घटकाला लक्ष्य केले जात असताना सरकार म्हणून राज्याची भूमिका ठोस असायला हवी. मात्र, मनोज जरांगे एक दिवस उपोषणाला बसले की सरकारमधील चार-चार मंत्री आणि आमदार तातडीने चर्चेसाठी धाव घेतात. सरकारने सुरुवातीलाच मंत्री आणि आमदार पाठवून त्यांच्यापुढे पायघड्या घातल्या नसत्या, तर त्यांची हिंमत वाढली नसती. आता सरकारनेच ही हिंमत वाढवल्यामुळे त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागत आहेत.

ओबीसी नेत्यांना लक्ष्य करणे सहन करणार नाही

ओबीसी नेत्यांवरील टीकेचा समाचार घेताना वडेट्टीवार म्हणाले की, आम्हाला कोणी अशा पद्धतीने घाबरवू शकत नाही, आम्ही सोडणार नाही. सरकारविरोधात भूमिका घ्यायची असेल, तर ती जरूर घ्यावी; मात्र सरकारमधील असोत वा बाहेरील, ओबीसी नेत्यांना वैयक्तिक पातळीवर लक्ष्य करणे पूर्णपणे चुकीचे आहे. आता हे प्रकार सहन करण्यापलीकडचे झाले असून सरकारने अशा लोकांचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे.

प्रमाणपत्रासाठी कायदेशीर पुरावे आवश्यक

कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर भाष्य करताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ज्यांचे प्रमाणपत्र रद्द झाले आहे, त्यांना ते सिद्ध करण्यासाठी नियमानुसार आवश्यक पुरावे सादर करावेच लागतात. त्यामुळे कायद्यानुसार चालणाऱ्या प्रक्रियेवर आक्षेप न घेता आणि ओबीसी नेत्यांना टार्गेट न करता योग्य मार्गाने भूमिका मांडली पाहिजे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेच्या स्थितीवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशात हजारो शाळा बंद होत असून बारावीपर्यंत पोहोचण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण सोडत असल्याचा दावा करत त्यांनी सरकारच्या शिक्षण धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

हे ही वृत्त वाचा

मनोज जरांगेंना आभाळातून ज्ञान प्राप्त झालंय:दाढी नसली तरी सरकार त्यांची दाढी कुरवाळेल, विजय वडेट्टीवारांचा घणाघात

मुंबई2 दिवसांपूर्वी

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकार, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज ठाकरे यांच्या दौऱ्यासह विविध मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी केली. राज्यात भाजप आणि शिवसेनेत मोठे शीतयुद्ध सुरू असल्याचा दावा करत त्यांनी सरकारवर निशाणा साधला, तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांना ‘आभाळातून ज्ञान’ प्राप्त झाल्याचा टोला लगावला. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *