![]()
येथील उपजिल्हा रुग्णालयाला २००४ मध्ये ५० बेड आणि २०१४ मध्ये १०० बेडचा दर्जा मिळाला. मात्र सुसज्ज इमारती अभावी रुग्णसेवा निधी केवळ ३० बेडपुरताच मर्यादित आहे. १५ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन इमारतीसाठी जागा उपलब्ध करून दिली, तरी केवळ मोजणी
.
सन २००४ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आरोग्यमंत्री स्व. दिग्विजय खानविलकर यांच्या पुढाकाराने तत्कालीन ग्रामीण रुग्णालयाला ५० बेडचा दर्जा मिळाला. पुढे सन २०१४ मध्ये शासनाने १०० बेडचीही मान्यता दिली. पण तेवढी जागा पुरेशी नसल्याने त्याप्रमाणात डॉक्टर व परिचारिकांची भरतीच झाली नाही व आत्तापर्यंत केवळ ३० बेडचेच अनुदान मिळत राहिले आहे.
खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी स.न. ८४/६/२ब क्षेत्र ५६ आर जागा रुग्णालयाला उपलब्ध करून दिली. त्यानुसार उपजिल्हा रुग्णालयाने मोजणीसाठी माळशिरस भूमी अभिलेख कार्यालयाकडे प्रकरण पाठवले. मात्र त्यांनी या जागेच्या मोजणी फी . अतिदक्षता विभाग बंद: जागा व इमारतीअभावी अतिदक्षता विभाग सुरूच झालेला नाही. रक्तस्राव झालेल्या प्रसूती माता व गंभीर रुग्णांना सोलापूरला रेफर करावे लागते. . रिक्त पदांचा भरणा: परिचारिका, दंतचिकित्सक, फार्मसी सहायक, टंकलेखक पदे रिक्त आहेत. . व्हेंटिलेटर धुूळखात: कोरोना काळात मिळालेले १७ व्हेंटिलेटर डॉक्टर नसल्याने वापरात नाहीत. . शवचिकित्सक नाहीत: शवचिकित्सक नसल्याने मृत्यूनंतरही बाहेरून डॉक्टर बोलवावे लागतात. . स्वच्छतेचा बोजवारा: स्वच्छतागृहासाठी कर्मचारी नसल्याने स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. फी बाबत काहीही न कळवल्याने या मोजणी प्रकरणात पुढे काहीच प्रगती झाली नाही. वृत्तपत्रांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर भूमी अभिलेखाने मोजणी फीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर जिल्हा शल्य चिकित्सकांनी मोहोळ तालुक्यातील नरखेड रुग्णालयाच्या जागेची निःशुल्क मोजणी झाल्याचा दाखला दिला. मात्र भूमी अभिलेख कार्यालयाने त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी आदेशाची मागणी केली. या पत्रव्यवहारात ८ महिने उलटून गेल्यानंतर २३ मे २०२६ रोजी मोफत मोजणीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केला.
भरती झाली तरच सुरळीत होणार ^मोजणी होऊन नवीन इमारत उभारली व भरती झाली तरच हे सुरळीत होणार आहे. डॉ. ओव्हाळ, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अकलूज