![]()
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट आणि अजित पवार गट) पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. या विलीनीकरणाच्या चर्चेवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वात मोठा खुलासा केला आहे. “अजितदादांसोबत विलीनीकरणाची चर्चा झाली होती, अगदी तारीखही ठरली होती. पण अजितदादा गेल्यापासून विलीनीकरणाला ‘फुलस्टॉप’ मिळाला आहे,” असे स्पष्ट वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या सर्व राजकीय चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. राजकारणात असे तर्क-वितर्क रोजच चालतात. आमचा लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, विलीनीकरणाबाबत आता पुन्हा चर्चा होणार नाही. दादांसोबत विलीनीकरणाबाबत आधी चर्चा नक्की झाली होती, त्याची तारीख देखील ठरली होती. पण दादा गेल्यापासून विलीनीकरणाला फुलस्टॉप मिळाला आहे. बातमी सातत्याने अपडेट होत आहे..
Source link
अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पूर्णविराम:विलीनीकरणाची तारीखही ठरली होती, दादांसोबत चर्चा झाली होती- सुप्रिया सुळेंचा खुलासा