![]()
राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ई-फेरफार पीक पाहणी प्रक्रियेत येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांची पीक नोंदणी रखडली होती. याची गंभीर दखल घेत, राज्य सरकारने ई-पीक पाहणीला आता ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पीक नोंदी अचूक करून सरकारी योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळावा, या उद्देशाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी होते त्रस्त राज्यात ई-पीक पाहणी प्रकल्प राबवला जात असून, याअंतर्गत शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकाची नोंद ॲपवर करावी लागते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. मोबाईल ॲपमधील ‘जीओ लोकेशन’ मधील त्रुटी, गावांच्या नकाशात असलेली तफावत, गट क्रमांकाच्या समस्या आणि सर्व्हर डाऊन असणे यामुळे अनेक शेतकरी पीक नोंदणी करू शकले नव्हते. नोंदणी न झाल्यास पीक विमा, अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि शासनाच्या इतर योजनांपासून वंचित राहावे लागेल, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा उद्देश शेतकऱ्यांच्या या सर्व समस्यांची दखल घेत शासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत माहिती देताना सांगण्यात आले की, “पीक नोंदी अचूक असणे हे शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तांत्रिक अडचणींमुळे कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये आणि त्यांना योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी ही मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.” तलाठी स्तरावर नोंदणीला वेग या मुदतवाढीमुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी नोंदणी अद्याप झालेली नाही, त्यांनी आता वाढीव मुदतीत ती पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, शासनाच्या या निर्णयानंतर आता गावपातळीवर तलाठी स्तरावरूनही पीक पाहणी नोंदणीच्या प्रक्रियेला मोठा वेग आला असून, प्रलंबित नोंदी जलद गतीने पूर्ण केल्या जात आहेत. ———— हेही वाचा… पुण्याहून नागपूरला जाणारी बस पुलावरून खाली कोसळली:संभाजीनगरमधील भीषण अपघातात एकाचा मृत्यू, 20 हून अधिक जखमी
पुण्याहून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सला छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात झाला आहे. शहरातील केंब्रिज चौकाजवळ भरधाव बस पुलाचा सुरक्षा कठडा तोडला आणि ती थेट पुलाखाली कोसळली. या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या हृदयद्रावक दुर्घटनेत एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, २० पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सविस्तर वाचा
Source link