Headlines

अजित दादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी आज एकत्र दिसल्या असत्या:सुनील तटकरेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले- 12 फेब्रुवारीची तारीख निश्चित झाली होती




राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत सध्या कोणतीही अधिकृत चर्चा नसली तरी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासंदर्भात एक अत्यंत मोठा आणि खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. “जर आज अजितदादा असते, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र दिसल्या असत्या. त्यांच्या अपघाती निधनामुळे विलिनीकरणाचा हा विषय मागे पडला,” असा खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. १२ फेब्रुवारीची तारीख झाली होती निश्चित माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या विलिनीकरणाच्या प्लॅनबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “त्यावेळेला दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची नक्की चर्चा झाली होती. जर दादा असते, तर १२ फेब्रुवारी ही जी तारीख सांगितली जात होती, त्या दिवशी विलिनीकरण नक्की झाले असते. दादांच्या प्रखर इच्छाशक्तीतून आणि त्यांनी ठरवलेल्या बाबींनुसार हे घडेल, हे निश्चित होते.” ‘जवळचा सहकारी म्हणून मला सर्व कल्पना होती’ अजित पवारांसोबतच्या आपल्या जवळच्या संबंधांचा दाखला देत तटकरे पुढे म्हणाले, “स्वर्गीय दादांनी मला त्याबाबतीत पूर्ण कल्पना दिली होती. विलिनीकरणाचे स्वरूप कशा पद्धतीने राहील, हे त्यांनी निश्चितपणाने मला सांगितले होते. मी त्यांचा एक जवळचा सहकारी असल्याने त्यांनी माझ्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली होती. त्यामुळे ठरल्याप्रमाणे विलिनीकरण घडेल, असा नक्कीच विश्वास होता.” ‘दादांच्या निधनामुळे विषय तिथेच थांबला’ हा विलिनीकरणाचा विषय पुढे का गेला नाही? यावर बोलताना तटकरे यांनी खंत व्यक्त केली. “दादांच्या प्रखर इच्छाशक्तीमुळे हे विलिनीकरण पूर्णत्वास गेले असते. परंतु, दुर्दैवाने दादांच्या अपघाती निधनामुळे तो विषय त्या ठिकाणीच थांबला,” असे तटकरे म्हणाले. सुनील तटकरे यांच्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या पडद्यामागील घडामोडींवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजित पवारांनी विलिनीकरणाचा नेमका काय आराखडा तयार केला होता आणि त्यात कोणकोणत्या नेत्यांचा समावेश होता, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. ————–
हेही वाचा.. ब्रीच कँडीतील ‘ती’ 1 तास चर्चा:मोदींच्या फोनपाठोपाठ पटेल-सुनेत्रा पवारांकडून भेटीगाठी; विलीनीकरणाच्या चर्चांना का आले पुन्हा उधाण? इनसाइड स्टोरी ज्येष्ठ नेते शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वैद्यकीय तपासण्यांसाठी दाखल असतानाच, रुग्णालयाच्या दालनातून सुरू झालेल्या राजकीय हालचालींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्यापाठोपाठ आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान शरद पवारांनी पटेल यांना ’11 तारखेनंतर भेटू’ असा दिलेला निरोप आणि दुसरीकडे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, प्रियांका गांधी व उद्धव ठाकरे यांच्याकडून आलेले फोन, यामुळे या आजारपणाच्या सदिच्छा भेटींमागे ‘दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची’ किंवा नव्या राजकीय समीकरणांची स्क्रिप्ट शिजत आहे का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *