Headlines

अप्रत्यक्ष बहिष्कारच:उपमुख्यमंत्री शिंदेंचा तीन दिवस दौरा, भाजप पदाधिकाऱ्यांची पाठ, पालकमंत्री गोरेंसह स्थानिक आमदारही फिरकले नाहीत




कार्तिकी यात्रेनिमित्त तीन दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर होते मात्र या काळात पालकमंत्र्यांसह भाजपचा आमदार किंवा स्थानिक पातळीवरचा पदाधिकारी शिंदे यांच्या दौऱ्याकडे फिरकला नाही. विशेष म्हणजे पालकमंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी आ. समाधान अवताडे यांनीही तिन्ही दिवस उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. साताऱ्यातील राजकारणाच्या प्रभावाची चर्चा होती. श्री विठ्ठल रुक्मिणीची आषाढी एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या तर कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याची अलिखित परंपरा निर्माण झालेली आहे. त्यानुसार आषाढी यात्रेच्या महापूजेस मुख्यमंत्री येतात. तर मागील तिन्ही कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे येत आहेत.उपमुख्यमंत्री शिंदे हे गुरुवारी यात्रेच्या कामाची पाहणी करण्यासाठी पंढरपूरला आले होते. त्या संपूर्ण दिवसभरात पालकमंत्र्यांसह भाजपाचे स्थानिक आमदार समाधान अवताडे, प्रशांत परिचारक यांनीही गैरहजेरी लावली.दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पालकमंत्री सायंकाळी ५ वाजता आले होते. शनिवारी कार्तिकीची महापूजा करून ते दुपारी मुंबईला रवाना झाले. या दरम्यान एकही भाजप आमदार उपमुख्यमंत्री यांच्या भेटीला आलेले नाहीत. शिंदे यांच्या दौऱ्यावर भाजपचा बहिष्कार होता कि काय चर्चा रंगली आहे. सत्तेतील सहभागी भाजपच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवलेली असताना राष्ट्रवादीच्या आमदारांनी मात्र तिन्ही दिवस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सावली प्रमाणे सोबत केलेली आहे. पुणे पदवीधर विधानपरिषद निवडणूक, सांगली आणि सातारा जिल्हा बँकांच्या निवडणुकात राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाची हातमिळवणी झाल्याचे बोलले जात असताना पंढरीतही याचा प्रत्यय आला. राष्ट्रवादी आमदारांची सावलीप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात सोबत महापूजेपूर्वीच पालकमंत्री जयकुमार गोरे दर्शन घेऊन निघून गेले पालकमंत्री जयकुमार गोरे हे शुक्रवारी पंढरपुरात मुक्कामी होते, शनिवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास ते विठ्ठल मंदिरात गेले आणि नित्यपूजा संपन्न होताच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत करून मंदिराबाहेर पडले. त्यांच्या सोबत आ.धैर्यशील कदम, अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी, सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *