Headlines

अभिनेता इम्रान खानला भारत सोडण्याची नोटीस:28 ऑक्टोबरपर्यंत मुदत, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनात झाला होता सहभागी




बॉलिवूड अभिनेता आणि सुपरस्टार आमिर खानचा भाचा इम्रान खान याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. मुंबईतील एका आंदोलनात सहभागी होणे इम्रान खानला चांगलेच महागात पडले असून, मुंबई पोलिसांनी त्याला थेट भारत सोडण्याची नोटीस बजावली आहे. या नोटिशीनुसार, इम्रान खानला येत्या २८ ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत देश सोडून जावे लागणार आहे. नेमके प्रकरण काय? मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी नुकतेच मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर एका आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात अभिनेता इम्रान खान याने सहभाग घेतला होता. याच आंदोलनादरम्यान मुंबई पोलिसांनी कारवाई करत इम्रान खानला ताब्यात घेतले होते. काही काळानंतर त्यांना सोडून देण्यात आले असले, तरी आता या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अमेरिकन नागरिकत्वामुळे अडचण वाढली इम्रान खान हा मूळचा भारतीय नागरिक नाही. त्याच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. परदेशी नागरिक असतानाही भारतातील राजकीय किंवा प्रशासकीय विरोधातील आंदोलनांमध्ये सहभागी होणे, हे भारतीय इमिग्रेशन कायद्याचे उल्लंघन मानले जाते. याच कायद्यातील संबंधित तरतुदींचा आधार घेत मुंबई पोलिसांनी इम्रान खानला ही नोटीस बजावली असून, २८ ऑक्टोबरपूर्वी भारत सोडण्याचे कडक निर्देश दिले आहेत. ३०० ते ४०० जणांवर FIR दाखल या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. ऑगस्ट क्रांती मैदानावरील आंदोलनाप्रकरणी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, इम्रान खान, अली भोजानी यांच्यासह तब्बल ३०० ते ४०० अज्ञातांविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ‘जाने तू… या जाने ना’, ‘दिल्ली बेली’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला इम्रान खान आता कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या या मोठ्या दणक्यानंतर इम्रान खान आता नेमका कधी भारत सोडणार आणि याबाबत तो काय कायदेशीर पावले उचलणार, याकडे संपूर्ण बॉलिवूड आणि चाहत्यांचे लक्ष लागून आहे. ——————- हेही वाचा.. इम्रान खानला देश सोडण्याची नोटीस, मग अक्षय कुमारचं काय?: संजय राऊतांचा सरकारला सवाल, अंकिता भंडारी प्रकरणावरूनही हल्लाबोल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उत्तराखंडमधील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्या प्रकरण, अभिनेता इम्रान खानला दिलेली देश सोडण्याची नोटीस आणि सुप्रीम कोर्टातील याचिका या विविध मुद्द्यांवरून राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *