Headlines

कर्नाटक सरकार शेतकऱ्यांची थट्टा करतेय…:केंद्राच्या मदतीची वाट न पाहता सरकारने तातडीने दिलासा दिला, विरोधकांनी कर्नाटकचे वास्तव पाहावे- नवनाथ बन




कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींसमोर काय पत आणि इज्जत आहे, हे आपण सर्वांनीच पाहिले आहे. राहुल गांधींनी कॉलर धरून त्यांना मागे खेचले होते आणि आता तेथील सरकार शेतकऱ्यांना कॉलर धरून मागे खेचण्याचे काम करत आहे. ज्या राज्यात सत्ता आहे, तिथे काँग्रेस शेतकऱ्यांना भरीव मदत का करत नाही? असा थेट सवाल भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 6 हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. याअंतर्गत प्रत्येक बाधित शेतकऱ्याला दिवाळीपूर्वी 5 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. ही अंतिम मदत नसून केवळ तात्पुरता आधार आहे. तरीही यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.
पंचनामे पूर्ण झाल्यावर अधिक भरीव मदत नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेस नेते नाना पटोले, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि रोहित पवार यांना मला एकच सांगायचे आहे की, कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना केवळ अडीच हजार रुपयांची मदत दिली आहे; तर आपल्या सरकारने 5 हजार रुपयांची मदत दिली आहे. यांपैकी कोणती मदत जास्त आहे, याचे उत्तर काँग्रेस आणि विरोधकांनी द्यावे. हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे सरकार असल्याने केंद्राच्या मदतीची वाट न पाहता 5 हजार रुपयांची तात्पुरती मदत त्वरित जाहीर करण्यात आली. संपूर्ण पंचनामे पूर्ण झाल्यावर अधिक भरीव मदतीची घोषणा केली जाईल. कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली नवनाथ बन म्हणाले की, कर्नाटकमध्ये दुष्काळ निवारणासाठी एकूण 1,250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे; तर महाराष्ट्रातील महायुती सरकारने पहिलाच हप्ता 6 हजार कोटी रुपयांचा दिला आहे. हाच आमच्यात आणि तुमच्यात असणारा फरक आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने शेतकऱ्यांच्या तोंडाला कसे पाने पुसले आहे, हे विरोधकांनी आधी उघड्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे. कर्नाटक सरकारने शेतकऱ्यांची थट्टा केली नवनाथ बन म्हणाले की, चारा छावण्यांसाठी कर्नाटकमध्ये अवघी 25 कोटींची तरतूद आहे, तर महाराष्ट्रात 62 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कर्नाटकात कोणतीही कर्जमाफी करण्यात आलेली नाही, फक्त कर्जवसुलीला मुदतवाढ देऊन शेतकऱ्यांची थट्टा केली गेली आहे. याउलट आमच्या सरकारने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफी देण्यासोबतच थकीत वीज बिल माफीचाही ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे नेते कर्नाटकात शेतकऱ्यांची दिशाभूल करतात आणि महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारवर निष्कारण टीका करतात, असा टोलाही नवनाथ बन यांनी लगावला. हे ही वृत्त वाचा मी पूर्णेकरांची केस लढू नये म्हणून एकनाथ शिंदेंकडून प्रयत्न होईल:शिंदेंची ताकद कितीही असली, तरी संविधानाची पॉवर मोठी- गुणरत्न सदावर्ते
ठाणे आता पूर्वीसारखे शांत राहिलेले नाही. प्रदीप पूर्णेकर आणि पोलिस अधिकारी भोईर यांची हत्या होते, तर कल्याणमध्ये जागेसाठी बौद्ध भिक्षूंना विस्थापित केले जाते. या सर्व घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिला पाहिजे, असा जोरदार निशाणा ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी साधला आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *