![]()
प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे स्वागत करण्यासाठी नेप्ती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘मॅनेजमेंट-टीचर्स-पॅरेंट्स-स्टुडंट कन्वेंशन’ आयोजित करण्यात आले. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्वागतासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत करण्यात आली. कार्यक्रमानंतर राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयाच्या परिसरात मान्यवर तसेच पालकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रा. ह. दरे यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी संस्था सातत्याने निर्णय घेत असून, विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी संस्था अविरत कार्यरत राहील, अशी ग्वाही दिली. संस्थेचे सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील यांनी बदलत्या शैक्षणिक परिस्थितीवर भाष्य करताना शिक्षणाची वाढती गती, बदलत्या संधी आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आत्मसात करावयाच्या आवश्यक कौशल्यांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे सहसचिव मुकेश मुळे, खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, विश्वस्त जयंतराव वाघ, राजेश्वरी जगताप, डॉ. नितीन घवाटे, राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयात मागील वर्षी राबवण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी डॉ. एम. के. भोसले, डॉ. एस. एम. वाळके, प्रा. पी. जी. निकम, प्रा. ए. बी. काळे, प्रा. एन. बी. गाडे , डॉ. व्ही. व्ही. पाटील, प्रा. बी. एन. खरड , प्रा. पी. आर. मुटकुळे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अक्षय देखणे यांनी, तर आभार प्रथम वर्ष समन्वयक डॉ. एम. के. भोसले यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत करण्यात आली.
Source link
अभियांत्रिकीच्या नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत,पालकांच्या हस्ते वृक्षारोपण:श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकीत पालक-शिक्षक मेळावा