![]()
उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील हीमपूर दीपा पोलिसांनी कारवाई करून मोठ्या प्रमाणात विस्फोटक साहित्य आणि काडतुसे जप्त केली. या प्रकरणाचे धागेदोरे धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तेरखेड्यापर्यंत पोहोचले आहेत. बिजनौर पोलिसांनी तेरखेड्यातील अमजद यासीन हा विस्फोटक साहित्याचा पुरवठादार असल्याचे तपासात समोर आल्यानंतर त्याच्या शोधासाठी उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक तेरखेड्यात दाखल झाले आहे. सुतळी बॉम्ब बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या दारूचा काडतूस बनविण्यासाठी वापर करण्यात आल्याने ही कारवाई होत आहे. बिजनौर पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी चौकपुरी येथील बजरंग फायर वर्क्स फटाका कारखान्यावर छापा टाकला. कारवाईत १३० किलो ॲल्युमिनियम पावडर, ५५९ किलो गंधक, ५४८ किलो पोटॅशियम नायट्रेटसह सुमारे ३९ क्विंटल ५९ किलो तयार सुतळी बॉम्ब जप्त करण्यात आले. तसेच ३१५ व ३२ बोअरची जिवंत व खोका काडतुसेही आढळली.या प्रकरणी मो. युसूफ बंदूहसन आणि गुफरान अन्सारी यांना अटक करण्यात आली.चौकशीत अमजद यासीन हा कच्चा माल पुरवत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार उत्तर प्रदेश पोलिसांचे एक अधिकारी व दोन अंमलदारांचे पथक तेरखेड्यात तळ ठोकून आहे. येरमाळा पोलिसांच्या मदतीने अमजदचा शोध घेतला जात आहे. बिजनौर पोलिसांच्या तपासातील धागेदोरे तेरखेड्यापर्यंत पोहोचल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांचे विशेष पथक धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले आहे. या पथकात एक पोलिस अधिकारी आणि दोन पोलिस अंमलदारांचा समावेश आहे. बिजनौरपर्यंत ‘कनेक्शन’ बिजनौर पोलिसांच्या कारवाईनंतर या प्रकरणाचे धागेदोरे थेट धाराशिवपर्यंत पोहोचले आहेत. तेरखेडा येथील अमजद यासीन हा सुतळी बॉम्ब तयार करण्यासाठी लागणाऱ्या दारूचा पुरवठा करीत असल्याची माहिती चौकशीत समोर आली आहे. याच साहित्याचा वापर बिजनौरमध्ये काडतुसे तयार करण्यासाठी केल्याचा संशय आहे. फटाक्याआडून शस्त्रनिर्मिती अमजदने दिलेल्या माहितीनुसार, दारूचा वापर बिजनौरमध्ये काडतुसे तयार करण्यासाठी करण्यात आला. त्यामुळे फटाका उद्योगाच्या आडून शस्त्रनिर्मितीचा प्रकार सुरू होता का, याचा तपास होणे गरजेचे आहे. कच्च्या मालाचा पुरवठा, वाहतूक, पैसे देणाऱ्या व्यक्ती आणि तयार काडतुसे कुठे पाठवली जात होती, याचीही चौकशी होणार आहे.
Source link
अमजदच्या शोधासाठी यूपी पोलिस तेरखेड्यात:काडतूस प्रकरणाचे धागेदोरे धाराशिव जिल्ह्यामध्ये