![]()
रायगड जिल्ह्यातील दिघी येथे प्रस्तावित “ग्रीनफील्ड जहाज बांधणी औद्योगिक समूहा’त आता माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड सहभागी होणार आहे. यासाठी नॅशनल शिपबिल्डिंग अँड हेवी इंडस्ट्रीज पार्क महाराष्ट्र लिमिटेड आणि एमडीएल यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. या प्रकल्पामुळे राज्यात १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार असून तब्बल ९० हजार नव्या रोजगारांची निर्मिती होणार आहे. दरवर्षी १.२ दशलक्ष ‘ग्रॉस टनेज’ जहाज बांधणीचे उद्दिष्ट सामंजस्य करारानुसार, एमडीएलने दिघी येथे दरवर्षी किमान १.२ दशलक्ष ‘ग्रॉस टनेज’ जहाज बांधणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. सध्या भारतात मोठ्या व्यावसायिक जहाजांची निर्मिती मर्यादित आहे. या १५ हजार कोटींच्या गुंतवणुकीमुळे मोठ्या जहाजांची निर्मिती भारतातच होईल. यातून राज्याच्या औद्योगिक क्षमतेला बळकटीसह कोकणातील स्थानिकांचे स्थलांतर थांबून मोठ्या प्रमाणावर कुशल आणि अकुशल रोजगार स्थानिक पातळीवरच उपलब्ध होईल.
Source link
रायगडमध्ये 15 हजार कोटींची गुंतवणूक:90 हजार रोजगार, दिघी होणार देशातील प्रमुख ‘जहाज बांधणी केंद्र’