Headlines

अमरावतीत तापमान 43.8 अंश सेल्सिअसवर:आठवड्यात 47 अंशांपर्यंत वाढण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज




अमरावतीमध्ये मंगळवारी (आज) तापमान ४३.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, ज्यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागला. हवामानतज्ज्ञांच्या अंदाजानुसार, आगामी आठवड्यात हे तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनेक नागरिक आदरांजली वाहण्यासाठी घराबाहेर पडले होते. त्यांना दिवसभर या तीव्र उन्हाचा सामना करावा लागला. दरम्यान, बुधवारी (उद्या) एक कमकुवत पश्चिमी विक्षोभ हिमालयावर येत आहे. यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि ईशान्य भारतात काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, मध्य भारतातील राजस्थान आणि गुजरातमध्ये कोरडे हवामान कायम राहील. विदर्भात पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. हवामानतज्ज्ञ प्रा. अनिल बंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील तापमान ४७ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. २० एप्रिलनंतरच तापमानात थोडा दिलासा मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *