Headlines

Maharashtra Heatwave SOPs Issued; 15 High-Risk Districts Under Focus



राज्यात वाढत्या तापमानाचा पारा ४७ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असताना, नागरिकांच्या आणि विशेषतः ऊन-वारा अंगावर सोसणाऱ्या घटकांच्या संरक्षणासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्य उष्णता कृती आराखडा आणि भारतीय हवामान विभागाच्या (IMD) सतर्कतेन

.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी या एसओपींची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता सर्वाधिक असते. यामध्ये लातूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलडाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

काय आहेत या तीन विशेष SOPs?

१. रस्त्यावरील कष्टकऱ्यांसाठी सुरक्षा (SOP-1): रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम मजूर, वाहतूक पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि डिलिव्हरी कामगारांसाठी ही नियमावली आहे.

  • वेळापत्रकात बदल: पिवळ्या, केशरी आणि लाल सतर्कतेनुसार कामाच्या वेळेत बदल करणे.
  • सुविधा: ठिकठिकाणी पाणी बूथ, ओआरएस (ORS) वाटप, सावलीची व्यवस्था आणि आरोग्य सुविधांवर भर.

२. खाण कामगारांसाठी विशेष तरतूद (SOP-2):

ही एसओपी प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींसाठी आहे.

  • विश्रांती केंद्रे: कामाच्या ठिकाणी ‘थंड विश्रांती केंद्रे’ (Cooling Centers) उभारणे.
  • जॉब रोटेशन: कामगारांना सतत उन्हात न ठेवता कामाची अदलाबदल करणे आणि महिला कामगारांसाठी विशेष सोयी पुरवणे.

३. उष्णता-प्रतिरोधक गृहनिर्माण (SOP-3):

गरीब व वसाहतींमधील घरांचे तापमान कमी करण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांवर भर.

  • कूल रूफ: घरांच्या छतावर रिफ्लेक्टिव्ह पेंट किंवा सावलीची व्यवस्था करणे.
  • नगररचना: मास्टर प्लॅन आणि गृहनिर्माण योजनांमध्ये ‘ग्रीन स्पेस’ आणि हवामान-संवेदनशील डिझाइनचा समावेश करणे.

प्रभावी अंमलबजावणीचे महाजन यांचे आदेश

आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. “वातावरणातील बदलामुळे तापमान ४९ अंशांपर्यंत जात आहे. त्यामुळे केवळ नियम करून चालणार नाही, तर जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवली जाईल,” असे महाजन यांनी स्पष्ट केले.

५० अंशांचा अभ्यास करून एसओपी तयार – विनिता सिंगल

मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी सांगितले की, मागील सहा महिन्यांपासून या एसओपींवर सखोल अभ्यास सुरू होता. जळगावमध्ये तापमान ५० अंशांपर्यंत पोहोचण्याच्या परिस्थितीचाही यात विचार करण्यात आला आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत नागरिकांनी घराबाहेर पडताना काय काळजी घ्यावी, याचे सविस्तर मार्गदर्शन यात दिले आहे.

महत्त्वाचे हेल्पलाईन क्रमांक :

जिल्हा नियंत्रण कक्ष: १०७७

रुग्णवाहिका: १०८

पोलीस हेल्पलाईन: ११२ / १००

या मोहिमेत महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, म्हाडा, सिडको आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा सक्रिय सहभाग असणार आहे. दरवर्षी या एसओपींचा आढावा घेऊन त्यात आवश्यक सुधारणाही केल्या जाणार आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.