Headlines

अमित शहांचे 370 हटवण्यापासून नक्षलवादाविरुद्धच्या लढ्यापर्यंत काम स्पष्ट:दिशा सालियान प्रकरण समोर येताच आदित्य ठाकरे कुठे गायब झाले, हे संजय राऊतांनी सांगावे- नवनाथ बन




केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बडतर्फीची मागणी करणारे खासदार संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाला महाराष्ट्रातील जनतेनेच निवडणुकीत बडतर्फ करून घरी बसवले आहे, असा पलटवार भाजप नेते नवनाथ बन यांनी केला आहे. अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांनी निवडून दिले असून, हे सरकार लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नवनाथ बन म्हणाले की, अमित शहा कुठेही गायब झाले नाहीत ते देशाचे नेतृत्व करण्यात सक्षम आहे. उद्धव ठाकरे आणि दिशा सालियान प्रकरण पुढे येताच आदित्य ठाकरे गायब झाले आहेत ते कुठे आहेत हे राऊतांनी सांगितले पाहिजे. अमित शहा गायब झाले नाही तर त्यांनी नक्षलवाद आणि कलम 370 गायब केला आहे. छात्रो की गुंज नाही झुठ की गुंज आहे. राऊतांनी मालक बदलला असून ते राहुल गांधींना आपला मालक समजत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर उद्धव ठाकरे जाणार का? असा सवाल बन यांनी केला आहे. बांगलादेशी घुसखोरांची नावे एसआयआरमध्ये हटवली गेल्याने राऊतांना त्रास झाला आहे. त्यांच्या मतांवर विजयी होण्याचा प्रयत्न उबाठाकडून सुरू होता. 25 टक्के मतदान झाले नाही नवनाथ बन म्हणाले की, मविआने विधानसभा निवडणुकीत 288 जागा लढवल्या, पण त्यांना 25 टक्के जागाही जिंकता आल्या नाहीत. हा तुमच्या आघाडीचा इतिहास आहे. ज्यांना जनतेने निवडून दिले नाही, अशा लोकांनी लोकांच्या जनादेशातून निवडून आलेल्या अमित शहांवर टीका करू नये. राऊतांनी पुरावे द्यावेत नवनाथ बन म्हणाले की, ‘एसआयआर’ प्रक्रियेत 13 कोटी जनतेची नावे कापली गेल्याबाबत संजय राऊतांकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते जाहीर करावेत. मतदान केंद्रांवर (बूथवर) महाविकास आघाडीचे कार्यकर्तेच उपस्थित नव्हते. त्यांना कार्यकर्ते मिळाले नाहीत, म्हणूनच ते या प्रक्रियेत सहभागी होऊ शकले नाहीत. पराभव झाला की निवडणूक आयोग, ईव्हीएमवर शंका घ्यायची आणि जिंकले की शांत राहायचे, ही राऊतांची दुटप्पी भूमिका आहे. मातोश्रीवर झोपा काढण्यापेक्षा पक्ष सुधारा नवनाथ बन म्हणाले की, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यापेक्षा पक्षाच्या नेतृत्वाने घरात बसून झोपा काढणे बंद करावे. तुमचे निवडून आलेले खासदार तुम्हाला वैतागून सोडून जात आहेत, त्याला निवडणूक आयोग काय करणार? मातोश्री आणि भांडूपमधील घरात बसून राहणाऱ्यांनी निवडणूक आयोगावर बोलण्यापेक्षा आधी आपला पक्ष सुधारावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील दुष्काळग्रस्त भागांचा प्रत्यक्ष दौरा करत असून, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाचा आढावा घेत आहेत. हे ही वृत्त वाचा आत्महत्येमागे जात शोधण्यापेक्षा शिक्षण व्यवस्थेतील दोष सुधारा:शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे व्यवस्थेचे नुकसान- राज ठाकरे
आयआयटी मुंबईतील साहिल वाकोडे या 20 वर्षीय विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. “या प्रकरणात जात आणि धर्माचा मुद्दा पुढे आणून मूळ समस्येपासून लक्ष भरकटवले जात आहे. विद्यार्थ्यांनी अशा विषारी राजकारणात अडकू नये, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *