![]()
राज्यात पावसाने दडी मारल्याने भयंकर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दीड महिन्यापासून पाऊस कोसळला नसल्याने शेतकऱ्यांची उभी पिके करपून गेली आहेत. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, शेतकऱ्यांकडून तातडीने दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदतीची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे सर्वच मंत्री सध्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील फिल्डवर उतरले असून, त्यांनी आज लातूरमध्ये जाऊन शेतीच्या नुकसानीची थेट बांधावर जाऊन पाहणी केली. मुख्यमंत्र्यांना पाहताच शेतकऱ्याला अश्रू अनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील ‘जाऊ’ गावात दुष्काळी परिस्थितीचा पाहणी दौरा करण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करपलेली पिके आणि बियाणांची पाहणी केली. आपल्या उद्ध्वस्त झालेल्या पिकांची अवस्था मुख्यमंत्र्यांना दाखवताना एका शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या व्यथा मांडल्या. मुख्यमंत्र्यांनीही या शेतकऱ्यांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला. “५० टक्केच पाऊस, पिकं करपली आहेत” पिकांची पाहणी केल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य व्यक्त करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “यावर्षी लातूर आणि धाराशिवमध्ये केवळ ५० टक्केच पाऊस पडला आहे. मागच्या वर्षी किमान ६५ टक्के पाऊस पडला होता. मी स्वतः बांधावर जाऊन पाहणी केली, तेव्हा पिके पूर्णपणे करपली असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे.” परिस्थिती अत्यंत विदारक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्वतः मान्य केले. “निधीची कमतरता पडू देणार नाही” शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना जास्तीत जास्त मदत करण्याचे आश्वासन दिले. या संकटाच्या काळात सरकार बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, दुष्काळ निवारणासाठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याकडे निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नाही, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. हेही वाचा.. फडणवीस दुष्काळी दौऱ्यावर:CM म्हणाले- बळीराजासाठी सर्व काही करू, सगळ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय थांबणार नाही, व्यथा मांडताना शेतकऱ्यांना कोसळले रडू राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी आज लातूर जिल्ह्यातल्या जाऊ गावात पोहचलेत. आता रब्बीसाठी शक्य ती मदत करू, बळीराजासाठी सर्व काही करू, सगळ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडताना शेतकऱ्यांना अक्षरशः रडू कोसळले. सविस्तर वाचा
Source link
मुख्यमंत्र्यांना पाहताच शेतकऱ्याला अश्रू अनावर:लातूरच्या बांधावर जाऊन देवेंद्र फडणवीसांनी दिला मदतीचा धीर