![]()
शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक, खासगी सावकारकी आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमध्ये अडकलेला भोंदू अशोक खरात अखेर शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आला आहे. नाशिक येथील विशेष तपास पथकाच्या ताब्यात असलेल्या खरातला शिर्डी पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले असून स
.
दरम्यान, खरातच्या आर्थिक व्यवहारांची व्याप्ती मोठी असल्याने अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सक्रिय झाले आहे. त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.
काय आहे नेमके ‘खरात आणि शिर्डी कनेक्शन’?
जमीन खरेदी फसवणूक, सावकारकी व गैरव्यवहारांची साखळी समोर येत आहे. शिर्डी शहर, निघोज निमगाव, काकडी येथील जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी होणार आहे. खासगी सावकारकीद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केल्याचीही चर्चा आहे. ‘समता पतसंस्था’ प्रकरणी संस्थेत सुमारे ५६ अनुयायांच्या नावावर खाती उघडण्यात आली.