Headlines

"अहिल्यानगर प्रीमियर चॅम्पियनशिप'चे शिवाजीयन्स संघाने पटकावले जेतेपद:अटीतटीच्या अंतिम सामन्यात सुमन एंटरप्रायझेसचा 2-1 ने पराभव‎




नमोह फुटबॉल क्लबच्या वतीने आयोजित ‘अहिल्यानगर प्रीमियर चॅम्पियनशिप २०२६’ या फुटबॉल स्पर्धेचा उत्साहात समारोप झाला. अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत शहरातील १८ संघांनी सहभाग नोंदवून फुटबॉलप्रेमींना खिळवून ठेवणाऱ्या अटीतटीच्या सामन्यांचा थरार अनुभवता दिला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ‘शिवाजीयन्स फुटबॉल क्लब’ आणि ‘सुमन एंटरप्रायझेस फुटबॉल क्लब’ यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. दोन्ही बाजूंनी आक्रमक चढाया झाल्या, मात्र निर्णायक क्षणी सरस खेळ करत शिवाजियन्सने २-१ अशा गोलफरकाने बाजी मारत विजेतेपदाचा करंडक उंचावला. विजेत्या संघाला १८ हजार रुपये व चषक, तर उपविजेत्या सुमन एंटरप्रायझेसला ७ हजार रुपये व चषकाने गौरविण्यात आले. स्पर्धेत उल्लेखनीय वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये मयूर गोरखा (शिवाजीयन्स) यांना ‘बेस्ट डिफेन्स प्लेअर’, ओंकार डांगोरे (सुमन एंटरप्रायझेस) यांना ‘बेस्ट गोलकीपर’ तर कामरान रंगरेझ (बाबा क्लब ‘ए’) यांना ‘टॉप गोल स्कोरर’चा बहुमान मिळाला. याशिवाय आपापल्या संघातून सर्वोत्तम खेळणाऱ्या तनिष्क गायकवाड, कृष्णा देशमुख, सनी मोंधिया, लकी मोरे, समर्थ भिंगारदिवे, विठ्ठल आदी खेळाडूंचाही विशेष सन्मान करण्यात आला. बक्षीस वितरण समारंभास रवींद्र गांधी, संदीप गांधी, अभय अकोलकर, राजेश चौहान आणि क्लबच्या संस्थापक नमिता फिरोदिया उपस्थित होत्या. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ वांद्रे, ऋतिक चौहान, सौरभ चौहान व पवन मुनोत यांच्या आयोजन समितीने परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *