Headlines

आंबेगाव बुद्रुक हादरले:किरकोळ वादातून सुनेने घेतला वृद्ध सासूचा जीव, पुणे पोलिसांकडून आरोपी अनुपमा शिंदेला अटक




पुणे येथील भारती विद्यापीठ परिसरात कौटुंबिक वादातून एका सुनेने 82 वर्षीय सासूचा स्वयंपाकघरातील सुरीने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली आहे. खून झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव सुमन अण्णासाहेब शिंदे (वय 82, रा. समृद्धी रेसीडन्सी, आंबेगाव बुद्रुक) असे आहे. अनुपमा संजय शिंदे (वय 60) असे अटक करण्यात आलेल्या सुनेचे नाव आहे. पोलिस शिपाई मल्लिकार्जुन कोळी यांनी या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनुपमा शिंदे, त्यांचे सेवानिवृत्त पती संजय, विवाहित मुलगा, सून आणि सासू सुमन हे एकत्र राहत होते. अनुपमा यांचा किरकोळ कारणांवरून सासूबरोबर नेहमी वाद होत असे. 12 मे रोजी अनुपमा आणि सुमन यांच्यात घरात पुन्हा वाद झाला. या वादातून अनुपमा यांनी सुमन यांच्यावर स्वयंपाकघरातील सुरीने अनेक वार केले. हल्ला केल्यानंतर अनुपमा यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले. कुटुंबीयांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घराचा दरवाजा उघडला. तपासणी केली असता, शयनगृहात सुमन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. पोलिसांनी केलेल्या चौकशीत कौटुंबिक वादातून सुनेने सासूचा खून केल्याची माहिती समोर आली. सुमन यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. अनुपमा यांची चौकशी केली असता, त्यांनी खुनाची कबुली दिली, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक मिथून परदेशी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *