Headlines

महालक्ष्मी सरसमध्ये हिंगोलीच्या बचत गटांवर लक्ष्मी प्रसन्न:मसाल्यांसह हळद पावडरला ग्राहकांची मोठी पसंती, आता रविवारपर्यंत खरेदीची संधी




महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानातंर्गत मुंबईत सुरु असलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनामध्ये हिंगोलीच्या बचतगटांना लक्ष्मी प्रसन्न झाली असून 12 दिवसांत तब्बल 10 लाखांची उलाढाल झाली आहे. या शिवाय तुरडाळ, हळद लोणच्याची ऑर्डर देखील मिळाली आहे. तर आता या प्रदर्शनाची मुदतही रविवारपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने खरेदी विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात उमेद अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी जिवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर प्रदर्शनीचे आयोजन केले जाते. यामध्ये बचतगटांना स्टॉल उपलब्ध करून देत त्यांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून दिली जाते. त्यानूुसार सध्या मुंबई येथील बीकेसी मैदानावर ता. 1 मे पासून महालक्ष्मी सरस प्रदर्शनीचे आयोजन केले आहे. या ठिकाणी हिंगोली जिल्हयातून पाच बचतगटांना पाठविण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी उत्कृष्ठ उत्पादने असलेल्या गटांची निवड करून त्यांना संधी दिली आहे. दरम्यान, हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील शिवशक्ती बचतगटाने उत्पादीत केलेल्या काळा मसाला, गरम मसाला, मिरची पावडर, हळद पावडर, लिंबू लोणचे, मिरची लोचणे या ठिकाणी विक्रीसाठी ठेवले आहे. हिंगोलीची हळद राज्यभरात प्रसिध्द असल्याने या गटाच्या हळद पावडरला मोठी मागणी आहे. या शिवाय इतर खाद्यपदार्थांनाही मागणी असल्याचे बचत गटाच्या पुजा नायक देशमुख यांनी सांगितले. मागील बारा दिवसांत या ठिकाणी सुमारे 10 लाख रुपयांच्या खाद्यपदार्थांची विक्री झाली असून या शिवाय तीन क्विंटल तुरडाळीची मागणी नोंदविण्यात आली आहे. या शिवाय हळदीच्या लोणच्याची सध्याच्या स्थितीत 10 जणांनी मागणी नोंदविल्याचे त्यांनी सांगितले. प्रदर्शनीला रविवारपर्यंत मुदतवाढ जिवनोन्नती अभियानाच्या वतीने ता. 1 मे ते ता. 14 मे या कालावधीत प्रदर्शनीचे आयोजन केले आहे. मात्र ग्राहकांचा प्रतिसाद लक्षात घेता त्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता हे प्रदर्शन रविवारपर्यंत ता. 17 चालणार आहे. सोमवारी ता. 18 या प्रदर्शनाचा समारोप होणार असल्याचे अभियान कार्यालयाच्या सुत्रांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *