![]()
मान्सूनच्या पावसात पिके उभी तर झाली मात्र गेल्या १५ दिवसाच्या खंडामुळे पिकांवर विविध संकटे येऊ लागली आहे. कापूस, सोयाबीन, तूर, मूगावर किडींचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. सुरुवातीस एल निनोच्या संकटामुळे खरीप हंगामातील पेरणी ही जूनअखेर ते जुलै महिन्यात सुरू झाली. दरम्यान पेरणी केल्यानंतर पावासाचा प्रदीर्घ खंड झाल्यामुळे उगवण क्षमता कमी झाली, त्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली. दरम्यान काही भागात पिके उगवली, तर लगेच खंड पडल्याने रसशोषक किडींसह पाने खाणाऱ्या अळींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. त्यामुळे फवारणी करूनसुद्धा पिकांवर रोगराई वाढतच गेली. कापूस पिकांवर तपकिरी काळे ठिपके पडत असून पाने लालसर होताना दिसत आहे. हळदीवरील करपा, तूर व ज्वारी पिकातील बुरशीजन्य रोग आणि मुंग-उडीद पिकांवर दाणे खाणाऱ्या अळींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसत आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी सुद्धा फवारणीचे नियोजन थांबवले आहे. पावसाची हीच स्थिती सप्टेबरमध्ये कायम राहिली तर आगामी रब्बी हंगामातील पेरणी करायलासुद्धा शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हावे लागेल, असे दिसून येते. दरम्यान रोगराईमुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून पुढे आली आहे.दरम्यान काही भागात पिके उगवली, तर लगेच खंड पडल्याने रसशोषक किडींसह पाने खाणाऱ्या अळींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. संग्रहित छायाचित्र. फवारणीपेक्षा हे उपाय महत्वाचे कापूस पिकात फुलगळ होणे हे प्रामुख्याने पाण्याचा ताण, अन्नद्रव्यांची कमतरता, तापमानातील चढ-उतार, रसशोषक किडी आणि वाढीचा असमतोलचे संकेत आहेत. फुलगळ दिसताच प्रतिबंधक/टॉनिक फवारण्यापेक्षा प्रथम कारण शोधणे महत्त्वाचे आहे. माती परीक्षण, पिकाची अवस्था, पाण्याची उपलब्धता आणि किडींचा प्रादुर्भाव यानुसार उपाययोजना केल्यास अधिक चांगला परिणाम मिळतो, असे तिवस्याच्या तालुका कृषी अधिकारी हेमलता इंगळे यांचे म्हणणे आहे.
Source link
पावसाची दडी; तिवस्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली:कापूस, सोयाबीन, तूर पिकांवर कीडीचा प्रादुर्भाव वाढला