Headlines

आई-वडिलांना चारधाम यात्रा घडवणाऱ्या मुलांच्या इच्छा पूर्ण होतात- इंदुरीकर महाराज:चारधाम यात्रेनंतर आयोजित गंगापूजन कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन‎




ज्या मुलाने आपल्या आई-वडिलांची सेवा केली, वयोवृद्ध आई-वडिलांना चारधाम यात्रा घडवली, अशा मुलाच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात, असे प्रतिपादन प्रख्यात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कन्नड येथे माजी आमदार तेजस्विनी जाधव यांच्या चारधाम यात्रा-पूर्तिप्रीत्य र्थ आयोजित कीर्तनात केले. कन्नड शहरातील साई मंदिर प्रांगणात ऐंशी वर्षीय माजी आमदार तेजस्विनी जाधव यांच्या चारधाम यात्रेनंतर आयोजित गंगापूजन कार्यक्रमात इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. आपल्या नर्मविनोदी शैलीत इंदुरीकर महाराज यांनी प्रबोधन केले. ते म्हणाले की, आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आईस ऐंशीव्या वर्षी चारधाम यात्रा निर्विघ्नपणे घडवून आणली. आता यानंतर आयुष्यात करायचे काय राहिले? सर्व गोष्टी मिळाल्या. आता कृतार्थ आयुष्य जगायचे. प्रत्येकाने धार्मिक आयुष्य जगले पाहिजे. आपल्या घरासमोर गाय ठेवलीच पाहिजे. जेथे गाय असते, तेथे लक्ष्मी असते. मोबाइलचा अतिरेक वाढला आहे. त्यामुळे मुलींची दिशा भरकटत आहे. मोबाइलचा अतिरेकी वापर टाळा. महिलांनी पाश्चिमात्य फॅशनच्या नादी लागू नये. चित्रविचित्र कपडे परिधान करून समाजाला विचलित करू नका. प्रत्येक घर संस्कारी करा. ज्ञानेश्वरीचे पठण प्रत्येक घरात झाले तर आपोआपच घरामध्ये चांगले संस्कार रुजतील. मुलेही संस्कारी होतील, असे प्रतिपादन इंदुरीकर महाराज यांनी कीर्तनातून केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी आमदार तेजस्विनी जाधव व माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा इंदुरीकर महाराज, शेलगावचे महाराज, वेरूळच्या अक्का, शनी महाराज, परमानंद गिरी, दयानंद महाराज, सुखदेव महाराज, सोपान महाराज, शेषराव महाराज, दयानंद महाराज, चंद्रकला वाकळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राजेंद्र हारदे, राजू मगर, डॉ. सदाशिव पाटील, गणेश पाटील, सुरेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अवचित नाना वळवळे, राजेंद्र गव्हाणे, प्रकाश काचोळे, आकाश बोलधने, पप्पू लोंढे, अविनाश डगळे, रमेश देशमुख, मुन्ना पैलवान, महेश गुजर, संतोष चव्हाण, गोविंद काळे, सुनील बोडखे, वाल्मीक कदम, कैलास शिंदे, तातेराव शिंगारे आदींसह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *