![]()
वादग्रस्त वक्तव्य करणारे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मदतीचे आवाहन करतानाच आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंत्यसंस्कारालाही कोणी जाऊ नये, अशी भाषा वापरल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वक्तव्याची चित्रफीत प्रसारित झाली. दरम्यान, दिव्य मराठी या चित्रफितीची पुष्टी करत नाही. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या ‘मयतालाही कोणी जाऊ नये,’ असे सांगतानाच मृतदेहाची जनावरांकडून विटंबना झाल्यानंतर त्याला आपल्या कृतीची जाणीव होईल, अशा आशयाचे विधान त्यांनी केले. आमदार श्वेता महाले यांच्यावरही केले होते वक्तव्य
Source link
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या मयतालाही जाऊ नये- आ. गायकवाड:शिंदेसेनेच्या आमदाराचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य, चित्रफीत व्हायरल