Headlines

आधी देवीच्या पाया पडले अन्‎नंतर मंगळसूत्र घेऊन पोबारा‎:मंदिरांना केले लक्ष्य लाल बुटाच्या लेसने आळेफाटा पोलिसांनी उकलला चोरीचा थरार‎




प्रतिनिधी | आळेफाटा ऐन लग्नसराईत साऊंड सिस्टिमवर डल्ला मारणाऱ्या तसेच बेल्हे गावातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुक्ताबाई माता मंदिरात चोरी करून पसार झालेल्या परजिल्ह्यातील सराईत टोळीला आळेफाटा पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. मंदिर चोरीपासून साऊंड सिस्टिम, डीजे साहित्य आणि एलईडी टीव्ही चोरीपर्यंतच्या अनेक गुन्ह्यांची उकल करत पोलिसांनी तब्बल ३ लाख ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने बेल्हे येथील मुक्ताबाई मंदिरात चोरी करण्यापूर्वी अत्यंत चलाखीने रेकी केली होती. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभ्यास करून ज्या खिडकीला ग्रील नव्हते,तीच खिडकी त्यांनी प्रवेशासाठी निवडली. अंधारात त्या खिडकीतून मंदिरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी आधी देवीचे दर्शन घेतले, देवीच्या पाया पडले आणि त्यानंतरच देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले. विशेष म्हणजे, चोरीच्या वेळी आरोपीच्या पायात असलेल्या लाल रंगाच्या शूजचा महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला आणि त्याच आधारे तपासाची दिशा निश्चित झाली. मुक्ताबाई देवीचे मंगळसूत्र जरी ‘बेन्टेक्स’चे असले तरी, लाखो भाविकांच्या श्रद्धेवरच चोरट्यांनी डल्ला मारल्याची भावना परिसरात व्यक्त होत होती.ही बाब आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या जिव्हारी लागली.त्यांनी गुन्हे शोध पथकाला कसून तपासाच्या सूचना दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषण,गोपनीय बातमीदार आणि स्थानिक माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोलिस पोहोचले. चोरट्यांनी दिली गुन्ह्याची कबुली या प्रकरणाची सुरुवात निमसेमळा-संतवाडी येथील विजय शरद फापाळे यांच्या टाटा ७०९ टेम्पोमधून ब्रिटीश कंपनीचे दोन एम्प्लिफायर चोरीला गेल्यानंतर झाली होती. या प्रकरणी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी तुकाराम पोपट कातोरे (सध्या रा.कळंब,ता.आंबेगाव,म ूळ रा.जांबुत बु.,ता.संगमनेर), निवृत्ती भाऊसाहेब मेंगाळ आणि अजय किसन मेंगाळ (दोघे रा.जांबुत बु.,ता.संगमनेर,जि.अह िल्यानगर)यांना ताब्यात घेतले.सखोल चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *