Headlines

आपट्याची परंपरा जपा, झाडांच्या संवर्धनातून निसर्ग वाचवा, आपट्याचे संवर्धन करा; तरच खऱ्या अर्थाने दसरा सण साजरा होईल : कल्याणी फिरोदिया यांचे आवाहन‎




दसऱ्याच्या दिवशी आपण आपट्याच्या पानांना सोने मानतो; मात्र पाने तोडण्याच्या नादात हे झाड ओरबाडले जाते. त्यामुळे आपटा वृक्ष दुर्मिळ होत चालला आहे. दसऱ्याला आपट्याचे नवीन झाड लावावे किंवा अस्तित्वात असलेल्या झाडाची निगा राखून संवर्धन करावे. तरच खऱ्या अर्थाने दसरा साजरा होईल, असे प्रतिपादन ऊर्जा गुरुकुल शाळेच्या कल्याणी गौरव फिरोदिया यांनी केले. आनंदवन, मांडवे (ता. पाथर्डी) येथे दुर्मिळ होत चाललेल्या आपटा वृक्षाचे पूजन करून ‘आपटा महोत्सव’ साजरा करण्यात आला. ‘परंपरा निसर्गपूजनाची, परंपरा भविष्यरक्षणाची’ हा संदेश देणाऱ्या या उपक्रमातून भारतीय परंपरा आणि पर्यावरण संवर्धन यांची सांगड घालण्यात आली. फिरोदिया म्हणाल्या, गुढीपाडव्याला कडुनिंबाचे महत्त्व आहे, त्याप्रमाणे दसऱ्याला आपटा वृक्षाचे महत्त्व जपले पाहिजे. केवळ सणापुरते झाडाचे स्मरण न करता वर्षभर त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. निसर्गातील जैवविविधता टिकवण्यासाठी वृक्षांचे अस्तित्व जपणे आणि पुढील पिढ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. दसऱ्याला आपट्याच्या पानांना प्रतीकात्मक सोन्याचे महत्त्व आहे. मात्र, या परंपरेच्या निमित्ताने वृक्षाचे महत्त्व समजून घेऊन त्याचे जतन करणे, हाच महोत्सवाचा मुख्य उद्देश होता. वृक्षांचे पूजन करण्याबरोबरच त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्पही प्रत्येकाने करावा, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी ऐसा असोसिएशनचे अध्यक्ष इंजि. प्रदीप तांदळे, शंतनू खानवेलकर, अमित गायकवाड, संदीप राठोड, नीता राठोड, प्रा. सूर्यकांत काळोखे, प्रा. सुनील मरकड, गणेश कांबळे, संतराम साबळे, शंकर बर्डे, जयप्रकाश विधाटे, विजयकुमार जगदाळे, राजेंद्र मरकड उपस्थित होते. दसरा सणाचा खरा अर्थ समजून घ्या फांद्या तोडू नका : प्रतीकात्मक पूजेसाठी केवळ एक-दोन पाने पुरेशी असतात; संपूर्ण झाड ओरबाडणे थांबवा. संवर्धनाचा संकल्प : दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर किमान एका आपट्याच्या रोपाची लागवड करून ते जगवण्याची जबाबदारी घ्या. जैवविविधतेचे रक्षक : आपटा हा केवळ धार्मिक वृक्ष नसून स्थानिक पक्षी आणि कीटकांच्या परिसंस्थेचा मुख्य आधार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *