![]()
आरबीआयने महागाईचा धोका लक्षात घेऊन रेपो रेट ०.२५% बेसिस पॉइंटने वाढवला. यामुळे रेपो रेट वाढून आता ५.५% झाला. २०२३ नंतरची ही पहिलीच वाढ आहे. मध्यवर्ती बँकेने धोरणात्मक भूमिका ‘न्यूट्रल’वरून ‘कॅलिब्रेटेड टायटनिंग’ केली. आता रेपो रेटशी संबंधित होम, कार व पर्सनल लोनचा ईएमआय वाढेल. ५० लाखांच्या २५ वर्षांच्या होम लोनचा (७.५% व्याज) मासिक हप्ता ₹८१७ ने वाढेल. आरबीआयने एसडीएफ दरही वाढवून ५.२५% केल्याने एफडीवर जास्त परतावा मिळेल. बजाज फायनान्सने एफडीवरील दर ०.१५% ते ०.४०% पर्यंत वाढवले बँकांनी कर्जावर व्याज वाढवले
बँक जुने दर नवे दर
पीएनबी 8.10% 8.35%
इंडियन बँक 7.95% 8.20%
बीओबी 7.90% 8.15%
बीओआय 8.10% 8.35%
ओव्हरसीज 8.10% 8.35% व्याजदरामध्ये वाढ, क्रूड महागले अन् नफा वसुलीमुळे सेन्सेक्स ४२९ अंकांनी घसरला मुंबई | रिझर्व्ह बँकेने ३ वर्षे ८ महिन्यांनंतर रेपो रेट ०.२५% वाढवल्यामुळे देशांतर्गत शेअर बाजारातील दोन दिवसांपासून सुरू असलेले तेजीचे सत्र थांबले. बुधवारी सेन्सेक्स ४२९ अंकांनी घसरून ७२,६३९ आणि एनएसई निफ्टी १७३ अंकांनी तुटून २२,६०३ वर बंद झाला. आरबीआयच्या पतधोरण समितीने एकमताने व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती व परदेशी गुंतवणूकदारांनी ६,१२१.३७ कोटींचे शेअर्स विकल्यानेही बाजारावर परिणाम झाला. दुहेरी दबाव : घरांच्या किमतीही
वाढल्या, आता कर्जही महागणार एनारॉक समूहाचे चेअरमन अनुज पुरींच्या मते, भारतातील मोठ्या ७ शहरांमध्ये जुलै-सप्टेंबर २०२६ मध्ये १,००,२२० घरे विकली गेली, जी वार्षिक ३% आणि तिमाही आधारावर १०% अधिक आहेत. यात परवडणाऱ्या घरांचा वाटा १६% राहिला, तर सरासरी किमती ७% ने वाढल्या. व्याजातील किरकोळ वाढही खरेदीदारांच्या निर्णयांवर परिणाम करेल. गृहकर्जे महागणार असल्याने घरांची विक्री घटेल. बचत कशी करावी: पार्ट पेमेंट वाढवल्यास व्याज बोजा कमी बँक बाजारचे सीईओ आदिल शेट्टींच्या मते जो लवकर पाऊल उचलेल, त्याची सर्वाधिक बचत होईल. ईएमआय थोडा वाढवा किंवा दरवर्षी काही रकमेचे पार्ट-प्रीपेमेंट केल्यास व्याजाचा बोजा कमी होऊ शकतो. बँकेलाही विचारून घ्या की दर वाढल्यास ईएमआय वाढेल की कर्ज कालावधी, जेणेकरून तुम्हाला स्थिती स्पष्ट राहील. आपल्यावर परिणाम: ₹ २५ वर्षांत २.४५ लाख जास्त द्यावे लागू शकतात गृहकर्ज कालावधी सध्याचा EMI (7.5%) नवा EMI (7.75%) EMI मध्ये वाढ एकूण वाढ
₹20 लाख 20 वर्षे ~16,112 ~16,419 ~307 ~73,706
30 लाख 20 वर्षे ₹~24,168 ~24,628 ~461 ~1.10 लाख
₹50 लाख 25 वर्षे ₹~36,950 ~37,766 ~817 ~2.45 लाख
बजाज फायनान्सने 12 ते 60 महिन्यांच्या एफडीवरील दर 0.15% ते 0.40% वाढवले.
नवे दर 8 ऑक्टोबरपासूनच देशभरात लागू होतील.
रेपो रेट म्हणजे काय: हा निश्चित व्याजदर आहे ज्यावर आरबीआय देशातील व्यावसायिक बँकांना अल्पकालीन कर्ज देते.
Source link
आरबीआयचा निर्णय, सुमारे 4 वर्षांनंतर रेपाे रेट वाढला:रेपो रेट आता 5.5%; 50 लाखांच्या गृहकर्जावर 817 जास्त ईएमआय