![]()
फुलंब्री तालुका जिल्हा परिषद शिक्षक पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन प्रदीप भिकनराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या प्रसंगी आमदार अनुराधा चव्हाण, जि. प. उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, प. स. सभापती सर्जेराव मेटे, जि. प. सदस्य गो
.
सभेत शिक्षक-सभासदांच्या ५१ गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात चेअरमन पाटील यांनी संस्थेसाठी भूखंड किंवा सरकारी इमारतीत जागा आणि एडीसीसी बँकेच्या सीसीच्या ११.५०% व्याजदरात कपातीची मागणी केली. आमदार चव्हाण यांनी सीसीच्या व्याजदर कपातीचा ठराव बँकेसमोर मांडण्याचे आश्वासन दिले, तर सभापती मेटे यांनी जागेसाठी कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेण्याचे सांगितले. आमदार चव्हाण यांनी मागील ४ वर्षांत मीटिंग, प्रवास व इतर खर्चात कपात करून १० लाखांहून अधिक बचत केल्याबद्दल संचालक मंडळाचे कौतुक केले.
सभेत कर्जाचा व्याजदर १०% वरून ९.५%, मुदत ठेव व्याजदर ९.५% वरून ९.००% करण्याचे महत्त्वपूर्ण निर्णय घे ण्यात आले. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन शीतल शेळके यांनी, तर आभार उषा ढोले यांनी मानले. सभेसाठी संचालक आप्पासाहेब चव्हाण, सुरेश भोपळे, ज्ञानेश सरोते, प्रकाश वाघमारे, अरुण शिरसाट, देविदास खिल्लारे, राजू ढंगारे, दिलीप वाघोले, प्रदीप बारकुल, रफत सय्यद, ज्ञानेश्वर मोरे, अशोक कुंटे व व्यवस्थापक भागिनाथ बखळे यांनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.