Headlines

आरोग्य विभागाचे बदली सत्र पूर्ण:91 कर्मचाऱ्यांची वर्णी, अमरावती जिल्हा परिषदेत आरोग्य कर्मचाऱ्यांचे स्थानांतर




जिल्हा परिषदेत सुरू झालेले बदली सत्र आज, सोमवारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. दुपारपूर्वी पूर्णत्वास गेलेल्या या अभियानात आरोग्य विभागातील ९१ कर्मचाऱ्यांचे स्थानांतर करण्यात आले. आरोग्य विभागातील सन २०२६ च्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेनुसार विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करावयाच्या होत्या. त्यानुसार आज सकाळी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात प्रक्रिया पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांनी ही प्रक्रिया राबविली. आरोग्य विभागातील औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक (महिला) तसेच आरोग्य सेवक (पुरुष) या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. औषध निर्माण अधिकारी संवर्गात आदिवासी भागामधून गैरआदिवासी भागात २ प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. गैरआदिवासी भागामधून आदिवासी भागात ४ प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. त्याचवेळी आरोग्य सहाय्यक (महिला) संवर्गात आदिवासी भागामधून गैरआदिवासी भागात १ प्रशासकीय व १ विनंती बदली करण्यात आली. गैरआदिवासी भागामधून आदिवासी भागात ६७ प्रशासकीय व १२ विनंती बदल्या करण्यात आल्या. आरोग्य सेवक (पुरुष) संवर्गात आदिवासी भागामधून गैरआदिवासी भागात १ प्रशासकीय व १ विनंती बदली करण्यात आली. गैरआदिवासी भागामधून आदिवासी भागात १ प्रशासकीय व १ विनंती बदली करण्यात आली. गैरआदिवासी भागामधून आदिवासी भागात ७२ प्रशासकीय व १३ विनंती अशा एकूण ९१ बदल्यांची प्रक्रिया आज पूर्ण झाली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.वि.) श्रीराम कुलकर्णी उपस्थित होते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे उपस्थित होते. सहाय्यक प्रशासन अधिकारी निलेश तालन, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्रीकांत मेश्राम व पंकज गुल्हाने यांच्यासह सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी हेमंतकुमार यावले, सुजित गावंडे, सतीश पवार, राहुल रायबोले आणि निशांत तायडे यांनी बदली प्रक्रियेचे कामकाज सांभाळले. पर्यवेक्षकांना डावलले, संघटना आक्रमक आरोग्य विभागातील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच आरोग्य पर्यवेक्षक (विस्तार अधिकारी) या संवर्गाच्याही बदल्या केल्या जाणार होत्या. परंतु त्या बदल्या ऐनवेळी एक पत्र जारी करुन रोखण्यात आल्या. एका पर्यवेक्षकाची सेवा (ड्युटी) जनगणनेच्या कामासाठी घेण्यात येत असल्याचे कारण त्यासाठी पुढे करण्यात आले. मात्र हे कारण पुरेसे नसल्याने राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष योगेश गवई व सचिव राजेंद्र नागपुरे यांनी त्यावर आक्षेप घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *