Headlines

उद्धवसेनेत पुन्हा फूट?:6 खासदारांच्या ‘दिल्ली मिशन’मुळे महाराष्ट्रात खळबळ; शिंदेही राजधानीत, आज निर्णायक हालचालींची शक्यता




महाराष्ट्राच्या राजकारणात २०२२ मधील शिवसेना फुटीनंतर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील तब्बल सहा खासदारांनी दिल्लीत तळ ठोकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हे खासदार स्वतंत्र संसदीय गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत असून, त्यासाठी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींना अधिक वजन मिळाले ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे. मंगळवारी रात्री उशिरा शिंदे दिल्लीला रवाना झाल्यानंतर या सर्व हालचालींना वेग आला असून, आज सकाळी शिंदे आणि संबंधित खासदारांची बैठक होणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीत स्वतंत्र गट स्थापन करायचा की थेट शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायचा, यावर अंतिम निर्णय होऊ शकतो. उद्धव सेनेसमोर नवीन संकट; ९ पैकी ६ खासदार वेगळ्या वाटेवर? लोकसभेत उद्धव ठाकरे गटाचे एकूण ९ खासदार आहेत. त्यापैकी ६ खासदार स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षांतरबंदी कायद्यानुसार एखाद्या पक्षातील दोन तृतीयांश सदस्य वेगळे झाले तर स्वतंत्र गटाला मान्यता मिळू शकते. त्यामुळे ९ पैकी किमान ६ खासदारांचा पाठिंबा मिळाल्यास या गटाला कायदेशीर वैधता मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. या खासदारांच्या वेगळ्या गटाची शक्यता… यांच्यासह काही खासदारांनी स्वतंत्र गटासाठी सहमती दर्शवली आहे. त्यापैकी काही खासदार आधीच दिल्लीत दाखल झाले असून उर्वरितही राजधानीत पोहोचले आहेत. डॅमेज कंट्रोलसाठी राऊत-अरविंद सावंत दिल्लीत या घडामोडींमुळे ठाकरे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनीही दिल्ली गाठली आहे. फुटीची शक्यता रोखण्यासाठी ते नाराज खासदारांशी संपर्क साधत असल्याचे सांगितले जात आहे. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर थेट आरोप करत, “खासदारांना फोडण्यासाठी १५ कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे,” असा दावा केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान लाइव्ह अपडेट्ससाठी खालील ब्लॉग वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *