Headlines

एकनाथ शिंदेंसह 6 खासदारांची अमित शहांशी भेट:दिल्लीत 50 मिनिटे चाललेल्या बैठकीची 'इनसाइड स्टोरी'; कॅबिनेट मंत्रिपदाची उत्सुकता




शिवसेना (उबाठा) पक्षातून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या 6 बंडखोर खासदारांनी मंगळवारी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण सदिच्छा भेट घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही भेट पार पडली. तब्बल 50 मिनिटे चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत विकासकामे, कायदेशीर प्रक्रिया आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावर सविस्तर चर्चा झाली. या भेटीमुळे राज्याच्या आणि केंद्राच्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्रामध्ये ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्यानंतर आणि ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतरचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच मोठा दिल्ली दौरा होता. आता दिल्लीतही शिंदेंची ताकद वाढली असून, आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर पक्षाचे संसदेतील वजन अधिक मजबूत करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विकासकामांवर सकारात्मक चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या या 6 खासदारांनी आपापल्या मतदारसंघांतील प्रलंबित विकासकामांचा मुद्दा अमित शहा यांच्यासमोर मांडला. केंद्राच्या अखत्यारीत असणारे विविध प्रकल्प आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्याची मागणी त्यांनी केली. अमित शहांची मोठी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व खासदारांचे स्वागत केले. तसेच, मतदारसंघातील लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले. या बैठकीत केवळ विकासकामेच नाही, तर शिवसेनेचा केंद्रातील भविष्यातील राजकीय सहभाग आणि पावसाळी अधिवेशनाची रणनीती यावरही सविस्तर चर्चा झाली. विशेष म्हणजे, याच वेळी भाजपचे नेते नितीन नबीन हेदेखील अमित शहा यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले गेले. खासदारांचे अधिकृत विलीनीकरण आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यावर एकनाथ शिंदे यांचा भर आहे. त्यानुसार, लोकसभा सचिवालय लवकरच या 6 नवनिर्वाचित खासदारांचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत विलीनीकरण झाल्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. कॅबिनेट मंत्रिपदाची उत्सुकता केंद्रात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वाढलेल्या संख्याबळामुळे शिवसेनेला केंद्रात 2 महत्त्वाची पदे (1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्री पद) मिळू शकतात. यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या गळ्यात पडण्याची सर्वाधिक चर्चा आहे. या 50 मिनिटांच्या बैठकीमुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. लोकसभा सचिवालयाकडून अधिकृत मान्यता मिळाल्यास, संसदेत शिंदेंच्या शिवसेनेचे पारडे अधिक जड होईल. तसेच, अमित शहा यांच्याकडून निधीची हमी मिळाल्यामुळे या 6 खासदारांना आपापल्या मतदारसंघांत विकासकामे वेगाने मार्गी लावता येतील, ज्यामुळे आगामी निवडणुकांसाठी त्यांची स्थानिक पातळीवरील पकड अधिक मजबूत होईल, असे बोलले जात आहे. हेही वाचा… मध्यरात्री ‘वर्षा’वर राजकीय खलबतं:जयंत पाटील, तटकरे आणि पटेल फडणवीसांच्या भेटीला; नव्या समीकरणांच्या चर्चांना उधाण
राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे. या अचानक झालेल्या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात असून, शरद पवार कोणती नवी राजकीय खेळी करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *