Headlines

एनआयएकडून छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये सर्च ऑपरेशन:बनावट आधारकार्ड, पाकिस्तान कनेक्शनचा संशय




राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएकडून शुक्रवारी (२९ मे) भारत-पाकिस्तान सीमेपार शस्त्रे, दारूगोळा आणि आयईडी तस्करी प्रकरणात मोठे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि महाराष्ट्रातील एकूण १२ ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून वाळूज परिसरातून एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरातील वाळूजमध्ये शुक्रवारी (२९ मे) पहाटेपासून केंद्रीय तपास यंत्रणांनी अत्यंत गुप्त पद्धतीने सर्च ऑपरेशन राबवले. बोगस आधारकार्ड रॅकेट, अवैध हत्यारांचा साठा तसेच पाकिस्तानशी संबंधित संशयास्पद व्यवहारांच्या तपासातून ही कारवाई सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय तपास यंत्रणांच्या विशेष पथकांनी वाळूज परिसरातील काही ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकत तपास सुरू केला. या संपूर्ण कारवाईदरम्यान तपास यंत्रणांनी कमालीची गुप्तता पाळली. प्रसार माध्यमांपासूनही संपूर्ण ऑपरेशन दूर ठेवण्यात आले. विशेष म्हणजे, स्थानिक पोलिसांनाही या कारवाईची पूर्वकल्पना नसल्याचे समजते. त्यामुळे सकाळपासून परिसरात विविध चर्चांना उधाण आले होते. कारवाईदरम्यान संबंधित भागात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून येणाऱ्या-जाणाऱ्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. काही संशयित व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. तपास यंत्रणांकडून लॅपटॉप, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कागदपत्रे आणि ओळखपत्रांची तपासणी सुरू होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *