![]()
‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने शहरातील आणि औद्योगिक वसाहतींमधील हॉटेल्स आणि कॅन्टीनवर मोठी कारवाई केली आहे. सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य देत, अत्यंत अस्वच्छ वातावरणात अन्न शिजवणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८ प्रमुख बड्या हॉटेल्स, बेकरी आणि इंडस्ट्रियल कॅन्टीनचे परवाने अन्न सुरक्षा मानके कायदा, २००६ च्या कलम ३२(३) नुसार निलंबित केले. एफडीएच्या तपासणीदरम्यान या बड्या आस्थापनांच्या किचनमधील वास्तव धक्कादायक असल्याचे समोर आले आहे. किचनमधील जमिनीवर सर्वत्र घाण होती. पिठाची मळणी करणारी मशीन अत्यंत अस्वच्छ जागी ठेवली होती. कांदे आणि बटाट्यांचे क्रेट्स थेट कचऱ्याच्या पिशव्यांच्या शेजारीच जमिनीवर अस्ताव्यस्त फेकलेले आढळले आहेत. कच्चे-शिजवलेले अन्न एकत्र साठवले हॉटेल निशांत पार्कमध्ये तपासणीदरम्यान चक्क उंदीर आणि कीटक आढळले. ग्रीन प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये कच्चे व शिजलेले अन्न एकत्र ठेवले होते. बहुतांश ठिकाणी गंजलेली उपकरणे, कोळ्यांची जाळी, तापमान नियंत्रणाचा अभाव आणि पिण्याच्या पाण्याची चाचणीच न केल्याचे एफडीएच्या अन्न सुरक्षा अधिकारी पी. पी. सुरसे, प्रज्ञा सुरसे आणि पी. एस. कुचेकर यांच्या तपासणीत समोर आले. त्रुटी दुरुस्ती पत्र देऊन निलंबन उठणार नाही सक्षम परवाना प्राधिकारी, सहायक आयुक्त (अन्न) द. वि. पाटील यांच्या आदेशाने ही कारवाई केली आहे. या आस्थापनांना अन्न उत्पादन व विक्री तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. केवळ त्रुटी दुरुस्तीचे पत्र देऊन हे निलंबन उठणार नाही, तर अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष फेरतपासणीनंतरच स्वतंत्र आदेशाद्वारे निर्णय घेतला जाईल, असे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी स्पष्ट केले आहे.
Source link
एफडीएची कारवाई:किचनमध्ये उंदीर, अन्न जमिनीवर; 5 हाॅटेल, 1 गृहउद्योग, 2 कॅन्टीनचे परवाने निलंबित, अन्न तयार करण्यासाठी गंजलेल्या उपकरणांचा वापर