![]()
दिल्लीमध्ये राहणारे मद्यप्रेमी आता घरबसल्या एका नवीन मोबाइल ॲपद्वारे मद्याची ऑनलाइन बुकिंग करू शकतील. ‘दिल्ली लिकर बुकिंग’ नावाचे हे ॲप दिल्ली स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (डीसीआयआयडीसी) लॉन्च केले आहे. या ॲपशी संपूर्ण शहरातील सुमारे २०८ किरकोळ विक्रीची दुकाने जोडण्यात आली आहेत. मात्र, मद्याची घरपोच डिलिव्हरी केली जाणार नाही. त्यामुळे ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर ४८ तासांच्या आत स्वतः दुकानात जाऊन बाटल्या घ्याव्या लागतील. बुकिंगनंतर मिळालेला QR कोड दुकानात दाखवावा लागेल ऑनलाइन बुकिंग ॲप सुरू करताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुकानांमध्ये होणारी गर्दी आणि प्रतीक्षेचा वेळ कमी करणे, पेमेंट काउंटरवरील दबाव घटवणे तसेच किंमती आणि बिलिंगमध्ये पारदर्शकता आणणे हा यामागचा उद्देश आहे. ॲपवर जाऊन ग्राहक उपलब्ध ब्रँड पाहू शकतात, आपल्या पसंतीचे स्टोअर निवडू शकतात आणि बाटलीचा आकार व प्रमाण ठरवू शकतात. ऑनलाइन बुकिंग आणि पेमेंटनंतर ग्राहकांना एक क्यूआर कोड मिळेल. तो दुकानात स्कॅन करून मद्य सहजपणे खरेदी करता येईल. १८ लिटर बिअर आणि जास्तीत जास्त ९ लिटर व्हिस्कीची मर्यादा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या ‘दिल्ली लिकर बुकिंग’ ॲपचा वापर करून दारू बुक करण्यासाठी व्यक्तीचे वय किमान २५ वर्षे असणे आवश्यक आहे. एक व्यक्ती ९ लिटर व्हिस्की आणि १८ लिटर बिअरपेक्षा जास्त खरेदी करू शकत नाही. एकदा उत्पादन विकले गेले किंवा दुकानातून घेतले गेले की ते परत करण्याची कोणतीही तरतूद नाही. मात्र, दुकानातून बाटली घेण्यापूर्वी बुक केलेली ऑर्डर रद्द करता येते. ब्रँड पाहून आवडीचे दुकान निवडून बुकिंग करता येणार अधिकाऱ्यांनी सांगितले की, ॲपवर ग्राहक उपलब्ध ब्रँड पाहू शकतात, आपल्या आवडीचे दुकान निवडू शकतात आणि बाटल्यांचा आकार व प्रमाण निश्चित करू शकतात. मात्र, विकलेली किंवा दुकानातून घेतलेली दारू परत करण्याची कोणतीही तरतूद नाही. तथापि, दारूची बाटली घेण्यापूर्वी बुक केलेली ऑर्डर रद्द करता येते.
Source link
दिल्लीत दारूच्या ऑनलाइन बुकिंगसाठी ॲप:बुकिंग केल्यानंतर 48 तासांच्या आत दुकानात जाऊन घ्यावी लागेल बाटली