Headlines

‘एफडीए’ नियमानुसार भाविकांना स्वच्छ, सुरक्षित महाप्रसाद:पिंपळगाव नजीकच्या काशीविश्वेश्वर महादेव मित्रमंडळाचा उपक्रम; 20 हजारांनी घेतला डाळ-बाटीचा लाभ‎


.

अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून धार्मिक कार्यक्रमातील महाप्रसादाचे आयोजन करण्याचा सकारात्मक उपक्रम निफाड तालुक्यातील पिंपळगाव नजीक येथे पाहायला मिळाला. काशीविश्वेश्वर महादेव मित्रमंडळाने तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त डाळ-बाटी महाप्रसादाचे आयोजन करताना अन्न व औषध प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन शासकीय शुल्क भरले. तसेच अन्नपदार्थांची तयारी, हाताळणी आणि स्वच्छतेबाबत आवश्यक खबरदारी घेतली. त्यामुळे सुमारे १५ ते २० हजार भाविकांनी स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार महाप्रसादाचा लाभ घेतला. मंडळाचे हे यंदाचे १४ वे वर्ष होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाच्या वतीने डाळ-बाटी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यंदा अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला. खासगी हॉटेल व आस्थापनांप्रमाणेच धार्मिक कार्यक्रमातही अन्नसुरक्षेचे नियम पाळण्याचा आदर्श मंडळाने घालून दिला. महाप्रसादाची तयारी, अन्नपदार्थांची हाताळणी, परिसरातील स्वच्छता आणि इतर आवश्यक बाबींबाबत प्रशासनाने निश्चित केलेल्या निकषांची पूर्तता करण्यात आली. हजारो भाविक सहभागी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमात श्रद्धेसोबत त्यांच्या आरोग्याची जबाबदारीही आयोजकांची असते, ही जाणीव ठेवून मंडळाने केलेले नियोजन कौतुकास्पद ठरले. इतर धार्मिक मंडळांनीही यापासून प्रेरणा घेऊन अन्नसुरक्षा नियमांचे पालन केल्यास भाविकांना सुरक्षित व दर्जेदार प्रसाद मिळण्यासोबतच समाजातही अन्नसुरक्षेबाबत सकारात्मक संदेश पोहोचू शकतो. काशीविश्वेश्वर मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी श्रावण महिन्यात भाविकांना डाळ-बाटीचा महाप्रसाद दिला जातो. यंदा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मंडळाने रीतसर परवानगी घेऊन महाप्रसादाचे आयोजन केले. अन्न तयार करतानाही पुरेशी काळजी घेण्यात आली. महिला व पुरुष भाविकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली होती. मंडळाने महाप्रसादाचे अत्यंत चांगले नियोजन केले.

महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *