Headlines

एमपीएससीची गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पडली लांबणीवर:25 ऑक्टोबरऐवजी 3 जानेवारी 2027 ला होणार




महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २५ ऑक्टोबर २०२६ रोजी होणारी गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली असून, आता ती ३ जानेवारी २०२७ रोजी होणार आहे. पेपरफुटी आणि निकालांतील गोंधळाच्या आरोपांवरून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या तीव्र असंतोषाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे उमेदवारांना तयारीसाठी अतिरिक्त वेळही मिळणार आहे. पारदर्शकतेच्या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन करत आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार व सचिवांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. संभाजीनगरातही दोन दिवसांपूर्वी निदर्शने करण्यात आली होती. आमदार रोहित पवार यांनीही आंदोलनात सहभाग घेत आयोगाच्या कारभारावर जोरदार टीका केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *