![]()
ओझरखेड कालव्याचे रब्बी हंगामातील आवर्तन ५ डिसेंबरला सोडण्यात यावे, अशी मागणी ओझरखेड कालवा कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांना निवेदन देण्यात आले. आवर्तन सोडण्याबाबत तातडीने कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करून पाणी सोडण्याचे नियोजन करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. ओझरखेड कालव्यावरील सावरगाव, सारोळे खुर्द, खडक माळेगाव, टाकळी विंचूर, पिंपळद, वाळकेवाडी, वाकी आणि वाहेगाव आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रब्बी हंगामातील आवर्तन तातडीने सोडणे आवश्यक आहे. तसेच पिके वाचवण्यासाठीही पाणी उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यामुळे ५ डिसेंबरला आवर्तन सोडण्याचे नियोजन करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. नाशिक येथील कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी निफाड पंचायत समितीचे माजी सभापती शिवा पाटील सुराशे, हनुमंत वाळके, भीमराज पवार, शंकरराव शिंदे, रेवन्नाथ शिंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
Source link
ओझरखेड कालव्याचे रब्बीचे आवर्तन 5 डिसेंबरला सोडा:शेतकऱ्यांसह कालवा कृती समितीची मागणी