Headlines

ओबीसी आरक्षणासाठी पंचमसाली‎समाजाचा अक्कलकोटमध्ये मोर्चा:‘हिंदू लिंगायत पंचमसाली’ नोंदीसह सरसकट ओबीसी आरक्षणाची मागणी




लिंगायत पंचमसाली समाजाचा इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गात सरसकट समावेश करावा, या मागणीसाठी रविवारी (दि. २६) अक्कलकोटमध्ये मोर्चा काढण्यात आला. विश्वलिंगायत पंचमसाली महासभा, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जगद्गुरू बसवजय मृत्युंजय महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ वाजता मल्लिकार्जुन मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. लिंगायत पंचमसाली समाजाला सध्या देण्यात येणाऱ्या ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ मर्यादित लोकांनाच मिळत असल्याचा दावा आंदोलकांनी केला. हे आरक्षण कायमस्वरूपी तोडगा नसल्याचे सांगत समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी करण्यात आली. समाजातील तरुण-तरुणींना शासकीय नोकऱ्या, शैक्षणिक संधी आणि विविध क्षेत्रांत समान संधी मिळाव्यात, हा मोर्चामागील प्रमुख उद्देश असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. समाजाच्या दाखल्यावरील नोंदीत बदल करून ‘हिंदू लिंगायत पंचमसाली’ अशी नोंद करावी आणि समाजाचा ओबीसी प्रवर्गात सरसकट समावेश करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मागणीसाठी अक्कलकोट तालुक्यातील विविध जिल्हा परिषद गट आणि नगरपालिका क्षेत्रांत समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन जनजागृती करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. मोर्चात आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील, जिल्हा संचालक आनंद बुक्कानुरे, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, बाबासाहेब पाटील, मल्लिनाथ अरवतकल, शांतवीर कळसगोंडा, धोंडप्पा येळमेळी, भीमणा आजूरे यांच्यासह मान्यवर आणि समाजबांधव उपस्थित होते. लोकप्रतिनिधींकडून पाठपुराव्याचे आश्वासन मोर्चात सहभागी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी समाजाच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. समाजाच्या मागण्यांवर शासनाने सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. तालुक्यात बैठकांद्वारे जनजागृती आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा मिळविण्यासाठी अक्कलकोट तालुक्यात समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या. जिल्हा परिषद गट आणि नगरपालिका क्षेत्रांत बैठका घेऊन समाजाच्या मागण्या मांडण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. विश्वलिंगायत पंचमसाली महासभेच्या वतीने आयोजित मोर्चात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभाग नोंदवून मागणीला पाठिंबा दर्शविला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *