![]()
कन्नड तालुक्यातील करंजखेड येथे शुक्रवारी भरदिवसा कोणीही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा कुलूपकोंडा तोडून आत प्रवेश केला आणि दोन खोल्यांतील कपाटे फोडून तीन तोळे सोन्याचे दागिने व कपाशी विक्रीचे ६० हजार रुपये रोख रकमेसह सुमारे पाच लाखांचा मु
.
करंजखेड ते बसस्थानक मुख्य रस्त्यालगत, बसस्थानकाच्या गजबजलेल्या परिसरात नारायण रामचंद्र गव्हाडे यांचे घर आहे. शुक्रवारी त्यांची पत्नी व आई शेतातील कामासाठी तर नारायण गव्हाडे शाळेच्या कामासाठी गेले होते. दुपारी दोन ते तीन या एका तासाच्या अवधीत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कुलूप कोंडा तोडून घरात शिरकाव केला. दोन्ही खोल्यांतील दोन कपाटे तोडून चोरट्यांनी एकूण सुमारे पाच लाखांचा ऐवज लांबवला. पिशोर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.