![]()
” मनुष्य देह प्राप्ती दुर्लभ आहे, त्याचा उपयोग सत्कर्म व समाजासाठी करावा. कर्मवीर गडसिंग गुरुजी हे शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील थोर ज्ञान तपस्वी होते. गुरुजींच्या संस्कारमय शिक्षणाचे तुम्ही सर्वजण वारसदार आहात. आचार, विचार आणि उच्चार यांचा त्रिवेणी
.
श्री नर्मदेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ मळेगाव संस्थेचे संस्थापक, जनरल सेक्रेटरी कर्मवीर गडसिंग गुरुजी यांची ९१ वी जयंती ‘प्रेरणा दिन’ म्हणून विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. पहिल्या सत्रात कर्मवीर गडसिंग गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास संचालक लक्ष्मणराव पाचकवडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनरल सेक्रेटरी सखूबाई गडसिंग होत्या. तर संचालक एल.वाय. पाटील, के.व्ही. जाधव, रामलिंग कोंढारे, अविनाश गायकवाड यांनी शब्दसुमनांनी आदरांजली वाहिली.
या प्रसंगी संस्थेला विविध मान्यवरांकडून आर्थिक देणग्या सुपूर्द करण्यात आल्या. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे सीईओ कौस्तुभ गावडे यांनी नर्मदेश्वर शिक्षण संस्थेस एक लाख रुपयांची देणगी देत संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सेवानिवृत्त प्राचार्य सतीश चव्हाण यांनी दोन लाख अकरा हजार रुपयांची देणगी दिली. सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुनील भोसले यांनी एक लाख अकरा हजार रुपयांची देणगी दिली. विकास ढेंगळे यांनी जनरल सेक्रेटरी सखुबाई गडसिंग यांना कृतज्ञता वंदन कविता फ्रेम भेट देऊन गुरुजींच्या कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पिसाळ, खजिनदार उद्योजक लक्ष्मण पाचकवडे मार्गदर्शन करताना म्हणाले की, “विद्यार्थी व शिक्षकांनी नेहमी समर्पण वृत्ती ठेवायला हवी. प्रत्येकाने संधीचा शोध घेत तिचे सोने करायला शिकावे. गुणवत्ता वाढविण्यासाठी संकल्प करून तो सत्यात उतरविण्याचा प्रयत्न करा. जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन उपाध्यक्ष प्रमोद जगताप यांच्या हस्ते पार पडले. या रक्तदान शिबिरात ४० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आपले सामाजिक दायित्व जपले. मार्गदर्शन करताना हभप गुरुवर्य प्रभाकर बोधले महाराज म्हणाले की, “प्रपंच आणि परमार्थ यातील भेद ओळखायला शिका. आचरण शुद्ध ठेवा, चारित्र्य संपन्न जीवन जगा. जीवन जगण्याचा मार्ग भगवत गीता दाखवते. मातृ-पितृ व समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रयत्न करा. समाजातील अज्ञानरूपी अंधकार नष्ट करणारे गुरुजी थोर ज्ञानतपस्वी होते. जीवन सुफलाम करण्यासाठी संस्कारमय शिक्षण ही काळाची गरज आहे. ज्ञानदेव आगलावे, संचालक लक्ष्मणराव पाचकवडे, संचालक सतीश वाघ, डॉ. जयसिंगराव देशमुख (विभाग प्रमुख, मराठवाडा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर), आर.पी. कॉलेजचे प्राचार्य ए.के. मंजुळकर तसेच विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्कारमय शिक्षण ही काळाची गरज
गुणवत्ता वाढीसाठी संकल्प करा