Headlines

काँग्रेस प्रदेश महासचिव डॉ. जफर खान यांचे निधन:वयाच्या 55 व्या वर्षी पुण्यातील खासगी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास




काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ. जफर अहमद खान यांचे सोमवारी रात्री पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. डॉ. खान यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात काही दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सोमवारी रात्री उशिरा त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. जफर अहमद खान हे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांनी संजयनगर प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून येत महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले. शहराच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. राजकीय क्षेत्रात त्यांचे सर्वच पक्षांतील नेत्यांशी चांगले संबंध होते. त्यांच्या साधेपणासाठी ते ओळखले जात होते. त्यांनी कर्नाटक आणि राजस्थान राज्यांचे प्रभारी म्हणूनही काम केले. काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक सेलसह विविध पदांवर त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान होते. अखेरच्या श्वासापर्यंत ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनाची बातमी शहरात येताच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये शोक पसरला. काँग्रेसचे शहर अध्यक्ष युसुफ शेख यांनी शोक व्यक्त करत, काँग्रेसच्या विचारधारेसोबत एकनिष्ठपणे चालणारा नेता गमावल्याची भावना व्यक्त केली. डॉ. खान यांच्या पश्चात दोन भाऊ, एक बहीण, पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *