Headlines

किशोर बोरकर यांची एसआयआरसाठी समन्वयक म्हणून निवड:बडनेरा विधानसभेसाठी मतदार यादी पुनरिक्षण अभियानासाठी जबाबदारी




मतदार याद्यांच्या सखोल पुनरिक्षण (एसआयआर) अभियानासाठी काँग्रेसने बडनेरा विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा माजी महानगर अध्यक्ष किशोर बोरकर यांची समन्वयक म्हणून निवड केली आहे. मतदारांची नावे यादीतून वगळली जाऊ नयेत, याची काळजी घेण्यासाठी पक्षाने हे पाऊल उचलले आहे. या निवडीची घोषणा शुक्रवारी मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आयोजित केलेल्या कार्यशाळेत करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. नितीन राऊत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, खासदार बळवंतराव वानखडे, ॲड. यशोमतीताई ठाकुर, खासदार प्रणिती शिंदे, खासदार प्रतिभा धानोरकर आणि एसआयआर अभियानाचे राज्य समन्वयक अभिजित सपकाळ यांच्यासह राज्यभरातील नेते उपस्थित होते. एसआयआर अभियानांतर्गत मतदारांची नावे तपासणे, दुरुस्त्या करणे, दुसऱ्या मतदारसंघातून नावे वगळणे आणि नवीन नावे नोंदवणे आदी कामे केली जातात. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एका समन्वयकाची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि सतेज पाटील हे देखील त्यांच्या मतदारसंघात समन्वयक पदावर काम करत आहेत. यावरून एसआयआर या विषयाला काँग्रेस पक्षात किती महत्त्व दिले जात आहे, हे स्पष्ट होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *