Headlines

कुंभारीत बैल सजावट स्पर्धेत पठाण यांच्या जोडीने पटकावला प्रथम क्रमांक:बैलजोड्यांच्या आकर्षक सजावटीने वेधले लक्ष‎




बैलपोळ्यानिमित्त बैल सजावट स्पर्धेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध रंगांची आकर्षक सजावट, पारंपरिक वेशभूषा आणि साजशृंगार केलेल्या बैलजोड्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. हर बोला महादेवाच्या जयघोषाने व डफळ्यांच्या गजराने कुंभारी नगरी दुमदुमून गेली. स्पर्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख तथा कुंभारीचे माजी सरपंच बाळासाहेब अतकरे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आली. विजेत्यांना एमआयडीसी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विजय जाधव, अशोक मराठे, एफडीआय चंदू राखोंडे, संजय वानखडे, पोलिस कॉस्टेबल मदन करवते, बाळासाहेब अतकरे, दिलीप आगळे, विनायक देशपांडे, सदानंद गावंडे, विठ्ठल सोनेकार, प्रमोद मुरुमकार, सचिन तायडे गुरुजी, संतोष काकपुरे, महावीर यादव आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नारायण गावंडे, ग्रामपंचायत सदस्य गोपाल टापरे व किशोर आखरे यांनी बैलजोडी मालकांचा शेला व टोपी देऊन सत्कार केला. पारंपरिक डफळ्यांचा निनाद, महादेवाच्या जयघोषासह सजलेल्या बैलजोड्यांमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण झाले होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आयोजक समिती व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक श्रीकृष्ण बिडकर गुरुजी यांनी केले. एमआयडीसी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला. अशी माहिती बैलजोडी सजावट स्पर्धेचे प्रसिद्ध प्रमुख विनोद ठोंबरे यांनी दिली आहे. सामाजिक एकोपा जोपासण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला. पोळ्यानिमित्त दरवर्षी बैल सजावट स्पर्धेचे आयोजन केले जाते. या स्पर्धेत सर्वधर्मीय शेतकरी बांधव स्वयंस्फूर्तीने आपल्या बैलजोड्या घेऊन मोठ्या संख्येने सहभागी होतात. सामाजिक एकोपा जोपासण्याचा आमचा प्रयत्न अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे, असे बाळासाहेब अतकरे म्हणाले. गजानन देवर यांच्या घरून दिव्य ज्योत व मानाची गुढी आणल्यानंतर विधिवत पूजन करून पोळा उत्सवाची सुरवात करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण श्रीकृष्ण बिडकर गुरुजी, विनायक देशपांडे, शत्रुघ्न ठोंबरे, यशवंत क्षिरसागर, दिनकर आंबुसकर, शेख सिराज, प्रमोद मुरुमकार, सदानंद गावंडे, ज्ञानदेव येवतकार व सचिन तायडे यांनी केले. गजानन डांबलकार यांची बैल जोडी द्वित्तीय स्पर्धेत रमजु पठाण यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना रोख १ हजार ५०० रुपये, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. गजानन डांबलकार यांच्या बैल जोडीने द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांना रोख १ हजार रुपये, शाल व पुष्पगुच्छ देण्यात आले. संतोष जानोकार यांच्या बैल जोडीने तृतीय क्रमांक मिळविला असून त्यांना रोख ७०० रुपये, शाल व पुष्पगुच्छ देण्यात आले. प्रोत्साहनपर बक्षिसे अनिल टेवाळे, भागवत खंडारे, मंगेश आखरे व संतोष जानोकार यांना प्रत्येकी ५०० रुपये, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *