Headlines

बाप्पाच्या आगमनाआधी मुंबईत पावसाची जोरदार एन्ट्री:कोकणाकडे जाणाऱ्या गणेशभक्तांना ट्रॅफिकचा फटका, राज्यात 11 ते 14 सप्टेंबरदरम्यान अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट




लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र जोरदार तयारी सुरू असतानाच, ऐन सणासुदीच्या तोंडावर वरुणराजाने मुंबई आणि उपनगरांमध्ये दमदार हजेरी लावली आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर अचानक कोसळणाऱ्या या मुसळधार पावसामुळे गणेशभक्तांची मोठी धांदल उडाली आहे. एकीकडे बाप्पाची मूर्ती घरी आणण्याची लगबग आणि शेवटच्या टप्प्यातील खरेदी, तर दुसरीकडे रस्त्यांवर साचलेले पाणी आणि महामार्गांवरील वाहतूक कोंडी, अशा दुहेरी संकटाचा सामना सध्या मुंबईकर आणि कोकणात जाणारे चाकरमानी करत आहेत. खरेदी आणि सजावटीच्या कामांवर परिणाम मुंबईत मध्यरात्रीपासूनच पावसाने चांगला जोर धरला आहे. पहाटेपासून कोसळणाऱ्या सरींमुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. आज बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीवर आणि रस्त्यांवरील सजावटीच्या कामांवर या पावसाचा मोठा परिणाम दिसून येत आहे. मुंबईत अनेक भागांत जोरदार पाऊस वसई-विरारमध्ये पावसाचा कहर वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात रविवारी सकाळपासून पावसाचा जोर प्रचंड वाढला आहे. अनेक सखल भागात आणि रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सार्वजनिक मंडळांसोबतच घरगुती बाप्पाच्या मूर्ती मंडपात आणि घरात आणण्याची लगबग सुरू असतानाच पाऊस कोसळत असल्याने भक्तांना मूर्ती झाकण्यासाठी प्लास्टिकचा आधार घ्यावा लागत आहे. हवामान विभागाने या परिसरासाठी आज आणि उद्या ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. मुसळधार पावसामुळे नालासोपारा रेल्वे स्थानकात साचले पाणी
हवामान विभागाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात ११ ते १४ सप्टेंबर दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर १५ सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, नाशिकसह मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडू शकतो. महामार्गावर वाहतूक कोंडी, चाकरमानी त्रस्त गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचा प्रवास यंदाही खडतर ठरत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. कोलाड ते इंदापूर या पट्ट्यात सुमारे १० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना २ ते ३ तास मोजावे लागले. दरम्यान, कालच्या तुलनेत आज वाहतूक संथ असली तरी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. देशातील प्रमुख शहरांचे तापमान ————- हेही वाचा.. यूपीच्या 26 जिल्ह्यांत पूर:एमपीच्या 15 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा, मंदाकिनीची पातळी वाढली; बिहारमध्ये पुराचा 44 लाख लोकांना फटका उत्तर प्रदेशात मान्सूनच्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. 26 जिल्हे पुराच्या विळख्यात आहेत. 4 लाख लोकसंख्या प्रभावित झाली आहे. गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेशातील 50 जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला. सर्वाधिक 16.9 मिमी पाऊस वाराणसीमध्ये नोंदवला गेला. रविवारीही राज्यातील 19 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विरामानंतर सक्रिय झालेल्या मान्सून प्रणालीमुळे मध्य प्रदेशातील अनेक शहरांमध्ये पाऊस होत आहे. हवामान विभागाने आज उज्जैन, धार, बडवानी आणि खरगोनसह 15 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *