Headlines

कुस्तीपटू महिलेची 3 मुलांसह नळदुर्ग‎ किल्ल्यावरुन उडी; 2मुलांसह आई ठार‎:सासरच्या त्रासामुळे आत्महत्या; विवाहितेच्या वडिलांचा आरोप‎




नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात गुरुवारी दुपारी ‎धक्कादायक घटना घडली. निलंगा तालुक्यातील पौळ‎ अंबुलगा येथील एमएसएफच्या माजी कर्मचारी अश्विनी‎मनोहर पौळ (30) या महिलेने आपल्या तीन मुलांसह ‎‎किल्ल्यातील उपळी बुरुजावरून 100 फुटांवरून उडी घेतली. ‎‎यात अश्विनी पौळ, त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य ‎‎आणि अडीच वर्षांची मुलगी क्रांती या तिघा मायलेकांचा ‎मृत्यू झाला, तर अडीच वर्षांची मुलगी वीरा गंभीर जखमी‎ आहे. तिच्यावर नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात ‎उपचार केले. नंतर तिला धाराशिव येथील शासकीय ‎रुग्णालयात दाखल केले, तिची प्रकृती गंभीर आहे.‎ अश्विनी या एमएसएफमध्ये नोकरी करत होत्या. 4 ‎‎महिन्यांपूर्वी त्यांनी पतीच्या सांगण्यावरून नोकरी सोडली‎ होती. मागील 4 महिन्यांपासून त्या मुलांसह माहेरी राहत ‎होत्या. पती व सासरच्या त्रासाला कंटाळून मुलीने हे टोकाचे ‎‎पाऊल उचलल्याचा आरोप अश्विनी यांच्या वडिलांनी केला ‎‎आहे. अश्विनीचे वडील तानाजी मोहिते यांनी मुलीच्या ‎मृत्यूस पती व सासरच्या मंडळींना जबाबदार धरले आहे. ‎‎पतीकडून तिला नेहमी त्रास दिला जात त्यांनी सांगितले.‎ अजिंक्य आईसोबत गेला अन् जीव गमावला‎ अश्विनीचे वडील तानाजी मोहिते हे शिक्षक असून कुस्तीशी त्यांचेही‎ नाते आहे. घटनेच्या वेळी ते प्रशिक्षणासाठी लोहारा येथे गेले होते, तर‎ आई व भाऊ हिप्परगा येथे गेले होते. त्यामुळे अश्विनी मुलांसह ‎घरातून नेमक्या कोणत्या वेळी निघाल्या, याची माहिती कुटुंबीयांना ‎नव्हती. अजिंक्यला कुटुंबीय सहसा सोबत नेत असत. मात्र गुरुवारी ‎तो आईसोबतच राहिला आणि दुर्दैवी घटनेत त्याचा मृत्यू झाला, अशी ‎माहिती पौळ कुटुंबियांच्या निकटवर्ती यांनी दिली.‎ महाराष्ट्राची वाघीण‎ अशी ओळख होती‎ मृत अश्विनी पौळ या राष्ट्रीय‎स्तरावरील कुस्तीपटू होत्या.‎त्यांच्या कुटुंबातील वडील,‎भाऊ, आई आणि बहीण हे ही‎कुस्तीपटू आहेत. विशेष म्हणजे ‎त्यांचे पती मनोहर पौळ‎ हे देखील कुस्तीपटू आहेत.‎कुस्ती क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर ‎नाव कमावलेल्या अश्विनी ‎यांना ‘महाराष्ट्राची वाघीण’ ‎म्हणून ओळखले जात होते. ‎त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने कुस्ती‎ क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली ‎जात आहे.‎ अश्विनी यांनी 5 सुवर्ण, 6 ‎रौप्यपदके मिळवली होती ‎ अश्विनी मोहिते उत्कृष्ट कुस्तीपटू ‎होत्या. शालेय जीवनापासून त्यांनी ‎अनेक मैदाने गाजवले होती. कुस्तीची ‎जिद्द पाहून वडिलांनी घरीच कुस्तीची ‎तालीम तयार केली होती. तिच्या ‎वडिलांना पण कुस्तीची आवड होती. ‎शालेय स्तरापासून ते राष्ट्रीय ‎स्तरापर्यंतचा अश्विनीने जिद्दीने यश ‎मिळवले होते. 2007 मध्ये ‎तिरुवनंतपुरम (केरळ) येथील राष्ट्रीय ‎कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक. ​2008 व ‎2009: गुरुदासपूर (पंजाब) आणि ‎चेन्नई येथील स्पर्धेत सुवर्णपदक ‎मिळवले. ​2010 मध्ये भोपाळ, कानपूर ‎आणि हरियाणा येथील राष्ट्रीय ‎स्पर्धांमध्ये यश मिळवले होते, तसेच ‎बालेवाडी (पुणे), कन्याकुमारी आणि ‎सैफई (लखनऊ) येथील राष्ट्रीय ‎कुस्ती स्पर्धा अश्विनीने गाजवल्या. ‎कारकीर्दीत पाच सुवर्ण आणि सहा ‎रौप्य पदके पटकविली आहेत. ‎ कुटुंबीय बाहेरगावी ‎जाताच पडल्या बाहेर ‎ अश्विनी या मागील 3 ‎महिन्यांपासून आपल्या तीन ‎मुलांसह माहेरी राहत होत्या. ‎चार महिन्यांपूर्वी त्यांनी ‎एमएसएफमधील नोकरी ‎सोडली होती. गुरुवारी त्या ‎मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावर ‎कशासाठी आणि कोणत्या वेळी ‎गेल्या, याची माहिती कुटुंबीयांना ‎नव्हती. कौटुंबिक वाद, नोकरी ‎सोडण्याचे कारण किंवा अन्य ‎काही कारणातून ही घटना ‎घडली का, याचा तपास पोलिस ‎करीत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *