राज्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले असून, संपूर्ण विदर्भासाठी ऑगस्ट महिना अक्षरशः दुष्काळी ठरला आहे. 1 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत विदर्भात पावसाची तब्बल 58 टक्के तूट नोंदवली गेली आहे. पाऊस लांबल्यामुळे आणि सततच्या ढग
.
ऑगस्ट महिन्यात पावसाची मोठी घट
विदर्भात 1 ते 31 ऑगस्ट या कालावधीत सरासरी 297.1 मिमी पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात केवळ 125.5 मिमी पावसाची नोंद झाली.
जिल्हावार तुटीची आकडेवारी
अकोला: ८४% तूट (केवळ ३३.५ मिमी पाऊस)
अमरावती: ८२% तूट (केवळ ४६.४ मिमी पाऊस)
यवतमाळ: ७८% तूट (५४.१ मिमी पाऊस)
वर्धा: ७३% तूट (६५.५ मिमी पाऊस)
नागपूर व वाशीम: प्रत्येकी ७१% तूट
बुलढाणा: ६१% तूट
चंद्रपूर: ५५% तूट
भंडारा: ४३% तूट
गडचिरोली व गोंदिया: तुलनेने स्थिती बरी; गडचिरोलीत ३२% तर गोंदियात २८% तूट नोंदवली गेली.
संत्र्याची मोठी गळ, धान पिकावर खोडकिडीचे संकट
संत्रा उत्पादक पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात पावसाअभावी संत्रा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. मागील दोन आठवड्यांत झाडांवरचा २५ ते ३० टक्के बहर गळून पडला आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, पाऊस न आल्यास ही गळ ८० टक्क्यांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
गोंदियात धानावर कीड
अधूनमधून येणाऱ्या हलक्या सरी आणि ढगाळ वातावरणामुळे धान पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाचवण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करत आहेत. पश्चिम विदर्भातील मूग, उडीद, सोयाबीन आणि कपाशीची पिके पाण्याअभावी सुकू लागली आहेत.
विदर्भातील धरणांमध्ये 62 टक्के पाणीसाठा
पावसाने ओढ दिल्याने धरणांमधील पाणीसाठ्याची स्थितीही बेताची आहे. 3 सप्टेंबर 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, संपूर्ण विदर्भातील धरणांमध्ये सुमारे 62 टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. यामध्ये नागपूर विभागातील धरणांमध्ये 63.06 टक्के, तर अमरावती विभागातील धरणांमध्ये 63.04 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
पूर्व विदर्भात आज विजांसह पावसाची शक्यता
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा आणि मध्य प्रदेशातील सक्रिय चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे आज (4 सप्टेंबर) पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामानासह तुरळक सरींची शक्यता आहे. गुरुवारी सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी 35.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पुढील चार आठवड्यांचा हवामान अंदाज
भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या चार आठवड्यांच्या अंदाजानुसार, राज्यात टप्प्याटप्प्याने पाऊस सक्रिय होईल.
३ ते १० सप्टेंबर: राज्यभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहण्याची शक्यता.
१० ते १७ सप्टेंबर: विदर्भात पावसाचा जोर वाढेल; सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज. मुंबईत १२ आणि १३ सप्टेंबरदरम्यान चांगला पाऊस अपेक्षित.
१७ ते २४ सप्टेंबर: मराठवाडा आणि लगतच्या भागात पावसाचे जोरदार पुनरागमन होण्याची शक्यता.
२४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर: कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या नव्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गणेशोत्सवात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा..
डीजेच्या आवाजामुळे सणाचे गांभीर्य जाते; बापटांवरील हल्ला लोकशाहीवर: पोलिस आयुक्त अन् राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे- शरद पवार

विद्यानंद बापट यांना मी काही ओळखत नाही, पण ते जे काही बोलत आहेत त्याला अर्थ आहे. कुठलाही सण हा लोकांना आनंद देणारा असला पाहिजे. डीजेच्या आवाजामुळे त्या सणाचे गांभीर्य निघून जाते, कोणी मत व्यक्त केले म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला तर हा हल्ला माझ्यामते लोकशाही आणि मूलभूत अधिकारावर आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी