Headlines

कृषी महाविद्यालयात गणेशोत्सवातून पर्यावरणाचा जागर:प्लास्टिक-थर्माकोलचा वापर टाळला; नैसर्गिक साहित्यातून गणेशोत्सवाला सामाजिक जाणीवेची जोड‎



येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर येथे गणेशोत्सवानिमित्त यंदा पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आलेली आकर्षक सजावट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विद्यार्थ्यांनी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेसोबत पर्यावरण संवर

.

सजावटीसाठी प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर पूर्णपणे टाळून केवळ नैसर्गिक व विघटनशील साहित्याचा कल्पकतेने वापर करण्यात आला आहे. यामध्ये आंब्याची व अशोकाची पाने, फुलांची सुंदर तोरणे, केळीचे खांब, बांबू, धान्याच्या लोंब्या तसेच पारंपरिक मातीची भांडी यांचा समावेश आहे. कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला निसर्गाची जोड देत ही संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. ‘परंपरा जपूया, पर्यावरण वाचवूया’ हा विचार केंद्रस्थानी ठेवून विद्यार्थ्यांनी ही सजावट उभी केली आहे. गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता त्यातून समाजाला पर्यावरण रक्षणाचा सकारात्मक संदेश मिळावा, असा या उपक्रमामागील उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व अधोरेखित करत सण साजरे करण्याची एक शाश्वत आणि आदर्श पद्धत समाजासमोर ठेवली आहे. अत्यंत कमी खर्चात, स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्याचा योग्य वापर करूनही विलोभनीय व आकर्षक आरास करता येते, हे या कृषी विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. या अभिनव उपक्रमाचे महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी व नागरिकांकडून कौतुक होत आहे.

भिंतींवर वारली कला सजावटीसाठी प्लास्टिक आणि थर्माकोलसारख्या साहित्याचा वापर टाळण्यात आला आहे. त्यामुळे पारंपरिक सौंदर्य आणि पर्यावरणपूरकता यांचा सुंदर मिलाफ या सजावटीत पाहायला मिळत आहे. या सजावटीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक वारली कलेचा करण्यात आलेला वापर. भिंती आणि सजावटीच्या विविध भागांवर वारली चित्रकलेतील पारंपरिक आकृत्या साकारण्यात आल्या आहेत. ग्रामीण जीवन, निसर्ग आणि मानवी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या चित्रांमुळे सजावटीला सौंदर्य प्राप्त झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *