![]()
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त सेंट विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘निसर्गातील छाया-कृती’ या आगळ्यावेगळ्या छायाचित्रण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत निसर्गातील विविध सुंदर, मनमोहक आणि अनमोल क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपले. फुले, पाने, आकाश, पक्षी, झाडे तसेच निसर्गातील विविध रमणीय दृश्यांचे विद्यार्थ्यांनी कलात्मक पद्धतीने छायाचित्रण केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या निरीक्षणशक्ती, सर्जनशीलता आणि कलात्मक दृष्टीला वाव मिळाला. यामध्ये इयत्ता सहावीमधून प्रथम क्रमांक आयुष क्षेत्रे, द्वितीय क्रमांक रियांश ललवानी, इयत्ता सातवीतून प्रथम क्रमांक स्वराली तांदळे व द्वितीय क्रमांक विधिराज सेंगल, इयत्ता आठवीतून प्रथम क्रमांक प्रांजल यादव व द्वितीय क्रमांक उदय देवढे, इयत्ता नववीमध्ये प्रथम क्रमांक सानवी मदने व द्वितीय क्रमांक आत्मजा वैद्य तसेच इयत्ता दहावीमध्ये प्रथम क्रमांक वेदश्री जोशी, द्वितीय क्रमांक सार्थक बेद्रे या विद्यार्थ्यांनी मिळवला. या उपक्रमाचे परीक्षण अमोल धोपावकर व दिव्या पोखरणा यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या छायाचित्रांचे परीक्षण करून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. निसर्गाकडे केवळ पाहण्याची नव्हे, तर त्यातील सौंदर्य अनुभवून ते कॅमेऱ्यात जतन करण्याची दृष्टी विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळाली. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हा उपक्रम संस्मरणीय ठरला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राम मेंघानी, उपाध्यक्ष रूपचंद मोटवानी, गोपाल भागवानी, दामोदर माखिजा, विश्वस्त महेश मध्यान, सुरेश हिरानंदानी, राजकुमार गुरुनानी, हरेश मध्यान उपस्थित होते.
Source link
कॅमेऱ्यात टिपले निसर्गाचे रंग:छायाचित्रण दिन साजरा