Headlines

हिंगोलीच्या वसमतमध्ये फिल्मीस्टाईल अपहरण:घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवला, तरुणीला पळवले; चौघांवर गुन्हा




वसमत शहरातील एका भागात घरात शिरलेल्या चौघांनी एका कुटुंबातील व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चैन व घरातील रोख ९ हजार रुपयांचा ऐवज ताब्यात घेऊन बंदुकीचा धाक दाखवून वीस वर्षीय तरुणीला पळविल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. २८ गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावरून जप्त केलेली बंदूक छऱ्याची असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत शहरातील एक कुटुंब घरात झोपले असतांना शुक्रवारी ता. २८ पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चौघांनी घरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी घरातील एका व्यक्तीचे दोरीने हातपाय बांधले त्यानंतर त्याच्या गळ्यातील सहाग्राम वजनाची सोन्याची चैन काढून घेतली तसेच त्यांच्या जवळील ९ हजार रुपये ताब्यात घेतले. यावेळी त्यांनी आरडाओरड केल्यानंतर दुसऱ्या खोलीत झोपलेली मुलगी बाहेर आली. तिने वडिलांचे हातपाय सोडले मात्र यावेळी चौघांनी बंदुकीचा धाक दाखवून मुलीला पळवून नेले. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी त्या मुलीच्या कुटुंबियांनी थेट वसमत शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी अनोळखी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वसमत शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुधीर वाघ, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर डेडवाल, जमादार गजानन भोपे, नागोराव बाभळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांना घटनास्थळावरून एक पिस्टल सापडले मात्र सदर पिस्टल छर्ऱ्याचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून त्या चौघांची ओळख पटविण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर तरुणीच्या शोधासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक डेडवाल यांचे पथकही रवाना केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *