![]()
श्री साईबाबांच्या १०८ व्या पुण्यतिथी उत्सवासाठी शिर्डी सज्ज झाली आहे. सोमवार (१९ ऑक्टोबर) ते बुधवार (२१ ऑक्टोबर) या कालावधीतील उत्सवासाठी ३ लाख भाविक शिर्डीत दाखल होतील, असा अंदाज आहे. गतवर्षी हा आकडा २ लाखांवर होता. संस्थानच्या वतीने १ लाख ६६ हजार ५८५ भक्तमंडळ सभासदांना निमंत्रण पत्रिका पाठवल्या आहेत, तर १ लाख ९९ हजार देणगीदार साईभक्तांना ई-मेलद्वारे उत्सवाचे निमंत्रण दिले आहे. उत्सवानिमित्त मंदिर व परिसरात फुलांनी व रोषणाईने सजले आहे. २२ हजार भाविकांच्या निवासाची सोय २२,७५९ भाविकांच्या निवासाची व्यवस्था उत्सवकाळात २२ हजार ७५९ भाविकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पाच हजार भाविकांना तात्पुरता निवारा म्हणून मंदिर परिसर, चावडीसमोरील भाग, मारुती मंदिर ते श्यामसुंदर हॉल, समाधी मंदिराच्या दक्षिणेकडील पालखी मार्ग, साई उद्यान आणि नवीन साई प्रसादालय परिसरात सुमारे ६५ हजार चौरस फुटांचा मंडप उभारला आहे. भक्तनिवास परिसरात अतिरिक्त निवासव्यवस्थेसाठी सुमारे २९ हजार चौरस फुटांचा मंडप उभारला आहे. असा एकूण ९४ हजार चौरस फूट मंडप आहे. ३ लाख भाविकांसाठी मोफत भोजन उपलब्ध यंदा ३ लाख भाविकांना मोफत प्रसाद भोजन उपलब्ध केले जाणार आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी गुलाबजाम, मुख्य दिवशी खीर, तर सांगतेच्या दिवशी बालुशाही हे गोड पदार्थ भोजनात दिले जातील. मोफत बुंदी प्रसाद वाटपासाठी नवीन दर्शनरांग तसेच साईनाथ मंगल कार्यालय, साई कॉम्प्लेक्स, गेट क्रमांक ४, द्वारकामाईसमोरील खुले नाट्यगृह, सेवाधाम, साई प्रसादालयासह ८ ठिकाणी विक्री केंद्रे सुरू राहणार आहेत. मंगळवारी मंदिर रात्रभर खुले :उत्सवाच्या मुख्य दिवशी मंगळवारी सकाळपासून धार्मिक कार्यक्रम होतील. सकाळी ७.३० वाजता समाधी मंदिरावरील सुवर्णकळसाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम होईल. त्यानंतर भिक्षा झोळी, कीर्तन, आराधना विधी, साईभजन व अन्य धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम होतील. रात्री ९.१५ वाजता गावातून श्रींच्या रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. नंतर मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहील.
Source link
शिर्डीत साई पुण्यतिथी उत्सव; 3 दिवसांत 3 लाख भाविक येणार:गतवर्षीच्या उत्सवात 2 लाख भाविक साईंचरणी, यंदा निवास व्यवस्थेसाठी 94 हजार चौ. फूट मंडप