Headlines

थकबाकी वसुलीची मोहीम:6 हजार थकबाकीदारांनो, कर भरा नाही तर मनपा करणार घरातील टीव्ही, फ्रिजही जप्त; आतापर्यंत 90 हजार नागरिकांकडून 86 कोटींची वसुली


मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर आता मनपाने कारवाईचा फास आवळला आहे. वारंवार सूचना आणि ३ नोटिसा बजावूनही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या सुमारे ६ हजार ८८५ थकबाकीदारांच्या मालमत्ता थेट सील करणे, मालमत्तेवर बोजा चढवणे आणि घरातील टीव्ही, फ्रिज अशा वस्तू जप्त करण्याच

.

आतापर्यंत शहरातील सुमारे ९० हजार मालमत्ताधारकांनी आपला कर प्रामाणिकपणे भरला आहे. यातून महापालिकेच्या तिजोरीत ८६ कोटी रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला आहे. मालमत्ता कराची वसुली आणखी वाढवण्यासाठी आयुक्त येडगे यांच्याकडून सर्व वॉर्ड अधिकारी आणि बिल कलेक्टर्स (कर वसुली लिपिक) यांच्या कामाचा नियमित आढावा घेतला जात आहे.

वसुलीमध्ये झोन ५ व १० सर्वात पुढे तर झोन १ व ३ सर्वात मागे

मालमत्ता कर वसुलीच्या या मोहिमेत शहरातील झोन- ५ आणि झोन- १० ची कामगिरी समाधानकारक असून, या दोन झोनमध्ये सध्या चांगली वसुली सुरू आहे. मात्र, दुसरीकडे झोन १ आणि झोन ३ ची करवसुली संथ गतीने सुरू असून, हे झोन वसुलीच्या शर्यतीत मागे पडल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मागे पडलेल्या झोनमधील अधिकाऱ्यांना आता वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे, तर थकबाकीदारांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

कर्जाच्या परतफेडीसाठी वसुली अनिवार्य

शहरातील मालमत्ता कराची थकबाकी ८२९ कोटींवर गेली असून, यात तब्बल २३० कोटी रुपये केवळ शास्तीचे (दंड) आहेत. मनपाने पाणीपुरवठा योजनेसाठी घेतलेले ८२२ कोटींच्या कर्जासह इतर कर्ज आणि देणी देण्यासाठी मनपाला सक्तीने वसुली करणे गरजेचे आहे. मनपाकडे करवसुलीशिवाय इतर कोणताही मोठा उत्पन्नाचा स्रोत नाही. यामुळे अधिकाऱ्यांनी वसुलीसाठी सक्ती सुरू केली.

अधिनियमानुसार जप्तीची कारवाई

नागरिकांनी थकीत मालमत्ता कर वेळेवर भरावा. वारंवार सूचना, नोटीस देऊनही न ऐकणाऱ्या मालमत्ताधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे. मनपा अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. -अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *